Home बुलढाणा आरोग्य शिबिरातील रुग्णांना पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले जळ

आरोग्य शिबिरातील रुग्णांना पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले जळ

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0010.jpg

आरोग्य शिबिरातील रुग्णांना पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले जळगाव खानदेश 95 रुग्णांची आकडेवारी
जळगांव जा.(किरण पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) मधील सुनगांव येथे दि. २४ मे रोजी शहीद जवान स्व. कैलास कापरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच महाराणा प्रताप जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती व छत्रपती संभाजी महाराज जयंती च्या निमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री समाधान दामधर, जेष्ठ समा तेजसेवक शेषराव वंडाळे, प्रविण फार्मर ग्रुप व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जळगाव मार्फत मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात हृदयरोग व जनरल मेडिसिन, हाडांचे विकार,नाक कान घसा विभाग, नेत्रविकार विभाग, सर्जरी विभाग, 2D इको व ECG व स्त्रीरोग विभाग अश्या एकूण ७ विभागाचे 700 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी व औषोधपचार करण्यात आला. यामधील 95 रुग्णांना शस्त्रक्रिया व पुढील उपचारासाठी जळगाव खान्देश येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
या वेळ आयोजक समाधान दामधर यांनी सर्व रुग्णांना भेटून रवाना केले.यावेळीशेषराव वंडाळे, राजुभाऊ राजपूत, डॉ शालिग्राम कपले, महादेव गवई,राजेश मिसळ, दिनेश ढगे, सुनील भगत, रामशिंग राजपूत, निखिल वंडाळे, गोपाल धुळे, मारोती कोथळकर, श्रीराम मिसाळ, गणेश वसुले, सुभाष ढगे,निलेश वंडाळे, रवी नानगदे, बाळू ठोसर, गणेश भड, महादेव भगत, राहुल इंगळे, निलेश भगत, रामेश्वर केदार,सागर भोपळे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल येउल, गजानन खिरोडकर, गजानन सोनटक्के, विजय वंडाळे, ज्ञानेश्वर अंबडकार,गणेश राऊत, अमोल भगत, तसेच प्रवीण फार्मर ग्रुप चे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श स्मृतिसोहळा पातुर्डा येथे साजरा
Next articleशहादाच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात, घाणीच्या साम्राज्याने मानव वस्ती ची जागा व्यापली.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here