Home कोल्हापूर विविध मागण्यांसाठी बंडखोर सेनेचा वडगाव नगरपालिकेत मोर्चा.

विविध मागण्यांसाठी बंडखोर सेनेचा वडगाव नगरपालिकेत मोर्चा.

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0035.jpg

विविध मागण्यांसाठी बंडखोर सेनेचा वडगाव नगरपालिकेत मोर्चा.

कोल्हापूर,( राहुल शिंदे युवा मराठा न्युज नेटवर्क):सध्या वडगांव नगरपालिकेतील सत्ताधारी बॉडीचा कार्यभार संपल्याने या ठिकाणी प्रशासकीय कारकीर्द लागू झाली आहे. असे जरी असले तरी प्रशासक म्हणून नगरपालिकेला या ठिकाणी स्वतंत्र मुख्यध्याकारी असने गरजेचे आहे. मात्र, सध्या अतिरिक्त कार्यभार हा तहसिलदारसो, हातकणंगले यांचेकडे आहे. तर प्रशासकीय कार्यभार हा मा. प्रांताधिकारीसोो, इचलकरंजी यांचेकडे आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी वेळ देता येत नाही. असेच आजपर्यंतच्या कालावधीत दिसून आले आहे.
त्यामुळे शहराचा गाडा हाकायचा कोणी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजेच इंदिरा कॉलनी लगत असणाऱ्या नागरी वस्तीमध्ये वीज कनेक्शन जोडण्याचे काम अनेक महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्याठिकाणी अनेक लोक सध्या आंधारात रहात आहेत. त्याठिकाणी तातडीने वीज कनेक्शन जोडणे गरजेचे आहे. मात्र,या कामाकडे संबंधीत अधिकारी व ठेकेदार यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. आंदोलनाच्या भुमिकेनंतर सध्या त्या ठिकाणी काम सुरू झाले आहे.मात्र,ते पावसाळ्यापूर्वी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून कंत्राट पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार दिला गेलेला नाही.त्यामुळे कचरा उठाव वेळेत होत नाही. यामुळे शहरात अनेक ठिकाणी महिला वर्गाची गैरसोय होत आहे. मध्यंतरी ४ ते ५ दिवसातून एकदा कचरागाडी येण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र यास आरोग्य कर्मचाऱ्यांना दोषी धरता येत नाही. कारण त्यांचा पगारच जर होत नसेल तर त्यांनी खायचे काय असा प्रश्न सध्या उभा आहे. याबरोबरच नगरपालिकेतून नाहरकत दाखले मिळणे बंद झाले आहे किंवा सही अभावी ते मिळत नाहीत.अनेक ठेकेदारांची बिले अद्याप मिळाली नसल्याने अनेक प्रकारची कामे सध्या बंद आहेत.त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना व इंदिरा आवास योजनेचे चेक अनेक घरकुल लाभार्थ्यांना मिळणे मुश्किल झाल्याने येणाऱ्या पावसाळ्यात त्यांच्या रहाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या कामाची निविदा पाच ते सहा महिन्यांपूर्वी काढली आहे.पण अदयाप सदर स्मारकाचे काम सुरू केलेले नाही. या कामाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे सरसेनापती धनाजीराव जाधव यांचा जाणिवपूर्वक अवमान करण्याचे काम सध्या प्रशासन करीत आहे. त्यामुळे ते काम पावसाळ्यापूर्वी त्वरीत सुरू करणे गरजेचे आहे. शाहु तालमिचे कामही सध्या बंद आहे. त्याठिकाणी खड्डे काढण्याव्यतिरिक्त कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे अनेक तरुणांना अनेक दिवसांपासून व्यायामापासून वंचित रहावे लागत आहे.त्यामुळे या तालमिचे काम तात्काळ सुरू करावे. महालक्ष्मी तलावाच्या बंधाऱ्यावरील झाडे झुडपे व गवत प्रचंड प्रमाणात वाढले आहे. ते दरवर्षी काढले जाते. मात्र या वर्षी पावसाळा तोंडावर आला तरी काढले गेलेले नाही. येणाऱ्या पावसाळ्यात बंधाऱ्यावरील झाडे झुडपे कुजून तलावाचे पाणी प्रदुषित होवून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा अनेक महत्वाच्या •प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहराचा कारभार सध्या रामभरोसे असे चित्र सध्या वडगांव नगरपालिकेमध्ये निर्माण झाले आहे. विज विभागाचीही अनेक कामे प्रलंबित आहेत. वडगांव शहराला महालक्ष्मी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो व त्याचबरोबर वारणा नदितूनही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दोन पाईप लाईनव्दारे केला जातो. पण मात्र त्यापैकी एक पाईप लाईन अनेक महिन्यांपासून बंद आहे.पावसाळ्याच्या तोंडावर ती सुरू करणे गरजेचे असताना याही महत्वाच्या गोष्टीकडे सोमनाथ माळी यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याबाबत विचारणा केली असता,या विभागाचे अधिकारी सोमनाथ माळी हे नागरीकांना उध्दट उत्तरे देण्याचे काम करून आपल्या कर्तव्यात कसून करीत आहेत. त्यामुळे त्यांची तातडीने या ठिकाणाहुन बदली करणेत यावी. नगरपालिकेला स्वतंत्र व पूर्ण अधिकार असलेल्या मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. सोमवार दि. ३०/०५/२०२२ रोजी वडगांव नगरपालिकेवर छेडलेल्या तिव्र निदर्शनाच्या माध्यमातून संबंधीत मुख्याधिकारी तथा तहसिलदारसो यांसह मा. जिल्हाधिकारीसो,यांच्याकडे बंडखोर सेना पक्षाच्या वतीने वरील नमूद प्रश्नांच्या संदर्भातील मागण्या करीत आहोत.सदर मागण्या येत्या ८ (आठ) दिवसात मान्य न झाल्यास पुढील टप्यातील आंदोलन हे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारक येथे केले जाईल. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर सुध्दा याबाबत व्यापक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी दिला,यावेळी या आंदोलनात सौ. शिवालीताई आवळे,सौ. उत्कर्षा भंडारे,रामभाऊ कुंभार,अविनाश भंडारे,अभिषेक भंडारे,अनिकेत पोळ,प्रेम पवार,राहुल पवार,योगेश शिवाजी माने,विनय आटोळे,महिपती मारुती कुंभार,सुशांत सकटे,श्रीमती प्रेमला हिरवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते,

Previous articleशामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी जिंकली भव्य बक्षिसे
Next articleकराटे कृती समितीचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here