Home अमरावती कराटे कृती समितीचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास निवेदन

कराटे कृती समितीचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास निवेदन

101
0

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0023.jpg

कराटे कृती समितीचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास निवेदन                                           वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

सर्व परिचित व लोकप्रिय असा जो आंतर शालेय स्पर्धे मध्ये आहे ,अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर आहे, खेलो इंडिया मध्ये आहे व जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत सुद्धा आहे परंतु आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा मध्ये कराटे हा खेळ नसल्या मुळे विद्यापीठाशी संलग्नित पाच ही जिल्ह्याच्या कराटे संघटक व पंच यांनी एक कृती समिती तयार करून कराटे या खेळाला विद्यापीठ खेळ निहाय यादी मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे जेणे करून विद्यार्थ्यां च्या भविष्यात फायदा होईल व त्यांच्या गुणवत्ते मध्ये सुधारणा होईल या साठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आज कराटे कृती समितीने माननीय संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ नि दिलेल्या तरतुदीं ची पूर्तता करून संपूर्ण डॉक्युमेंट्स तयार करून पाच ही जिल्ह्याची फाईल आज माननीय महोदय श्री. डॉ .अविनाश असणारे सर शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे सादर केली निवेदन सादर करताना विद्यापीठाशी संलग्नित पाच ही जिल्हा संघटक कराटे रेफ्री, पंच जे की अमरावती जिल्हा कडून प्रा.डॉ. खुशाल आळसपुरे सर ,सेन्साई सोनल रंगारी सर,सेन्साई आशिष श्रीवास सर, अकोला जिल्हा कडून सिहान अरुण सारवान सर,सेन्साई शिव मसने सर,सेन्साई कु. खुशबू चोपडे मॅडम , यवतमाळ जिल्हा कडून सिहान प्रा.आनंद भुसारी सर सेन्साई संजय कोल्हे सर,सेन्साई हाफिज शेख सर , वाशिम जिल्हा कडून सेन्साई बालकिशन नवगणकर सर,सेन्साई रणजित कथडे सर , बुलढाणा जिल्हा कडून सेन्साई फहिम सौदागर सर, सेन्साई अरविंद अंबुस्कर सर,सेन्साई सुनील चव्हाण सर यांनी आज सर्व मिळून विद्यापीठास निवेदन सादर केले निवेदन सादर करता वेळी माननीय महोदय श्री अविनाश असणारे सर शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली व येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये हा खेळ समाविष्ट करण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली त्यामुळे सर्व कृती समिती व विद्यार्थी यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग अमरावती विद्यापीठ यांचे खूप खूप आभार मानले.

Previous articleविविध मागण्यांसाठी बंडखोर सेनेचा वडगाव नगरपालिकेत मोर्चा.
Next articleवडिलांचे ऐकाल तर कायम खुश राहाल…! संजीवनी अाडणे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here