आशाताई बच्छाव
गावातील पाणीटंचाई करीता शासन उपाय योजना जाहीर
संग्रामपूर तालुक्यात येणार ४ विंधन विहिरी व २० गावांसाठी कुपनलिका मंजुरी संग्रामापूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधि युवा मराठा)
जिल्ह्याबरोबरच तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निवारणार्थ शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्यामध्ये विंधन विहिरी, खाजगी विहिर अधिग्रहण, तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, कूपनलिका व पाण्याचे टँकर आदींचा समावेश आहे ह्या करता पाणी टंचाई निवारणार्थ संग्रामपूर तालुक्यातील ४ गावासाठी विंधन विहिरी आणि २० गावांसाठी कुपनलिका असे एकूण २४ गावांसाठी विंधन विहिर व कुपनलिका मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अविकसित असणाऱ्या संग्रामपूर तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ तालुक्यातील आदिवासी भागातील चुनखडी,
हडियामल,शिवाजी नगर, चिचारी ह्या ४ गावासाठी विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या असून नवे भोन, आलेवाडी, सायखेड, लाडनापूर, शिवणी, कवठळ, हिंगणा कुंभारखेड, बावनबीर, एकलारा कोलद, जस्तगाव, आवार, पळशी (झांशी) करमोडा, वकाना, वडगाव वाण, वानखेड काटेल, रुधना ह्या २० गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गावांमधील पाणी टंचाई सोडण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आणि संग्रामपूर चे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली.