राजेंद्र पाटील राऊत
पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही सावंगी भांबळे येथील अवैध दारू विक्री चालूच
कठोर करवाई करण्यास बामनी पोलीस असमर्थ
कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न
गावातील युवकांनी दिला दारू विक्रेत्यांच्या घरात जाऊन दारू च्या बाटल्या फोडन्याचा इशारा आणी त्या
गावामध्ये कायदा आणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार असा प्रश्न् उपस्थित होत आहे …
प्रतिनिधी:-शत्रुघ्न काकडे पाटील (युवा मराठा न्युज नेटवर्क)
:-जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी दी .19/4रोजि सावंगी भांबळे येथील बचत गटाच्या महिला आणी ग्रामपंचायत ने गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते परंतु गावातील दारू बंद तर झालीच नाही पण गावामध्ये अजून नवीन अवैध दारू विक्रेते तयार झाले आहेत आनि हे दारु विक्रेते आन्लेला माल् लपुन ठेवुन त्या मधिल चार ते पाच बाटल्या खिशात ठेऊन गावात फिरत आहेत आणी दारू विक्री करत आहेत गावातिल दारू विक्रेत्यावर काहीच परिणाम झालेला नाही दारुड्यामुळे गावातील सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत बामनी पोलीस या प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष्य करत असल्याच गावातील महिलांचे म्हणणे आहे जर गावातील अवैध दारू विक्री पूर्ण पणे बंद नाही झाली तर महिला बचत गटातील सदस्या मा.पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालासमोर उपोषणास बसणार आहेत असे महिलांनी सांगितले आहे .
आणी तसे दिलेल्या निवेदनात नमूद देखील केले आहे ..
*प्रतिक्रिया*:-आम्ही बचत गटातील सर्वएकदा महिला मा.पोलीस अधीक्षक साहेबाना गावातिल अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले आणी बामनी पोलिसांना देखील त्याची प्रत दिली होती बामणी पोलिसांनी आम्हाला तुमच्या गावातील दारू पूर्ण पणे बंद करू असे आश्वासन दिले होते परंतु त्यांनी या अवैध दारू विक्रेत्यावर कोणतीच कठोर करवाही केलेली नाही उलट गावामध्ये एक दारूचे दुकान वाढले आहे त्यामुळे मा .पोलीस अधीक्षक साहेबानी या कडे स्वतः जातीने लक्ष्य घालावे आणी गावातील अवैध दारू विक्री कायमची बन्द करावी नाहीतर आम्ही सर्व महिला मा.पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत…
*द्वारकाबाई जनार्धन भांबळे*
*सचिव,स्व.स.महिला बचत गट सावंगी भांबळे*