Home भंडारा पहेला ते निमगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा

पहेला ते निमगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा

135

आशाताई बच्छाव

1001503746.jpg

पहेला ते निमगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा

पत्रकार संजीव भांबोरे यांनी केली रस्त्याची पाहणी

संजीव भांबोरे
भंडारा –तालुक्यातील पहेला ते निमगाव या 3 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून या रस्त्याच्या जागोजागी गिट्टी उघडली असून रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आज दिनांक 14 मे 2025 ला ला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक व सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे त्यांनी त्या रस्त्याला भेट देऊन पाहणी केली असता रस्त्याची अत्यंत दयनीय परिस्थिती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा याप्रकारे या रस्त्याची अत्यंत दैन्यवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या बाबतीत अनेक जण प्रतिनिधी, शासन ,प्रशासन यांना अनेकदा अवगत करण्यात आलेले आहे .परंतु अजून पर्यंत या रस्त्याकडे कोणत्याही जनप्रतिनिधी किंवा शासन प्रशासनाने या रस्त्याची दखल घेतलेली नाही . त्यामुळे क्षेत्रातील जनप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांना विनंती आहे की, त्यांनी पहेल्या कडून निमगाव कडे जाणारा रस्ता तात्काळ नव्याने डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Previous articleनिमगाव येथे सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर व श्रीमद भागवत सप्ताहाचे 17 मे 2025 ते 1 जून 2025 पर्यंत आयोजन
Next articleलग्न सोहळ्यात 1001 ग्रामगीता वाटून केला नवीन स्तुप्त उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.