Home नांदेड जंगम समाजातील युवकांनी मुखेड येथील रुद्र शिबिरात सहभागी व्हावे… ष.ब्र.प.१०८ श्री विरूपाक्ष...

जंगम समाजातील युवकांनी मुखेड येथील रुद्र शिबिरात सहभागी व्हावे… ष.ब्र.प.१०८ श्री विरूपाक्ष शिवाचार्य महाराज

194

आशाताई बच्छाव

1001504068.jpg

जंगम समाजातील युवकांनी मुखेड येथील रुद्र शिबिरात सहभागी व्हावे…
ष.ब्र.प.१०८ श्री विरूपाक्ष शिवाचार्य महाराज

मुक्रमाबाद/प्रतिनिधी  बस्वराज वंटगिरे 

श्री गणाचार्य प्रतिष्ठान व श्री वीरमाहेश्वर जंगम समाज, मुखेडच्या वतीने गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथे दि. १५ मे ते १४ जूनदरम्यान जंगम समाजातील १२ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मासिक श्री रूद्र शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गणाचार्य मठ संस्थान येथे सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविले जातात. व्याख्यानमाला, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सामूहिक विवाह सोहळा, सार्वजनिक वाचनालय, रक्तदान शिबिर, योग शिबिरासह धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. यातून सामजिक प्रबोधन करण्यात येते. भजन, कीर्तन, प्रवचन प्रवचन, शिवनाम
सप्ताह ही होतात. जंगम समाजातील विद्यार्थ्यांवर सुसंस्कार व्हावेत, धार्मिक विधी शास्त्रोक्त पध्दतीची माहिती व्हावी म्हणून गत ११ वर्षांपासूनचे पंरपरा महाराजांनी कायम ठेवली आहे . रुद्र शिबिरात दररोज सकाळी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे ५ दिवसाचे योग शिबिर. अनुभवी शास्त्री गणांचे मार्गदर्शन, राहण्याचा व जेवण्याचा उत्तम मोफत व्यवस्था, श्रीरुद्र, पुजाविधी व पंचांग शिकवले जाणार आहे. यात श्री ष.ब्र.प. १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड यांचे मार्गदर्शन राहील.दि.१५ मे २०२५ रोज गुरुवारी ठीक ११.०० वा.गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथे भव्य उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
श्री ष.ब्र.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मुखेड
श्री ष.ब्र. १०८ सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, देवणी
मा.आ.श्री प्रवीण स्वामी, उमरगा
श्री श्रावण जंगम (रा. जंगम समाज संघटना, प्रमुख)
श्री त्र्यंबक पटवेकर (भोकर)
व समस्त जंगम समाज संघटना पदाधिकारी, नांदेड
मासिक प्रशिक्षणासाठी
वेदमुर्ती शास्त्रीगन
श्री विश्वनाथ मठपती (श्रीशैलम) श्री विवेकानंद स्वामी (लातूर), श्री शुभम स्वामी (फुलवळ) श्री साईनाथ मठपती (पाचपिपळीकर) श्री शुभम स्वामी (जळकोटकर) या शिबिरास विशेष उपस्थिती राहणार आहे तरी पंचक्रोशीतील जंगम
समाजातील विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री.ष.ब्र.प.१०८. डॉ. पीरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.शिबीरासाठी
श्री नागनाथ स्वामी, मुखेडकर
यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन मठ संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleछत्रपती संभाजी विद्यालयाचे उज्वल यशाची परंपरा कायम शाळेचे १००% निकाल
Next articleलोकनाथ रायपुरे यांचा सामाजिक कार्याबद्दल बुद्ध पौर्णिमेला सत्कार कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.