Home नाशिक ताहाराबाद महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात संपन्न

ताहाराबाद महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात संपन्न

73
0

राजेंद्र पाटील राऊत

ताहाराबाद महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात संपन्न

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
ताहाराबाद येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम. एल. साळी यांच्या शुभहस्ते वसुंधरेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम. एल.साळी सर होते. यावेळी ते म्हणाले की, आज जागतिक वसुंधरा दिन जगभर साजरा केला जातो आहे. भारताच्या संदर्भात विचार केला तर असे लक्षात येते, येथील संस्कृतीतील प्रत्येक सणांमध्ये वसुंधरेच्या अंतर्गत असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या घटकाचे पूजन भारतीय नागरीक करत आला आहे. अलीकडे बदललेल्या वातावरणाला मनुष्यच कारणीभूत आहे. मनुष्याने निसर्गाचे नियम समजून वागले तरच त्याला भविष्यात चांगली जीवन जगता येईल असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रेय फलके म्हणाले की, आज जागतिक तापमान वाढीचे संकट सर्वांसमोर उभा आहे. याला कारणीभूत पृथ्वीवर भांडवलशाहीच्या माध्यमातून आलेले औद्योगीकरण, शेतीत केले जाणारे रासायनिक प्रयोग यामुळे वातावरणातील ओझोन वायूच्या स्तराला पोहोचलेल्या धोका हा मनुष्य जीवन एक दिवस धोक्यात आणणारा आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहून वसुंधरेचे रक्षण करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून व सुंधरेबद्दलची आपली अभिव्यक्ती व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक उमेश पाटोळे यांनी केले .सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक शिवदे यांनी केले. आभार प्राध्यापक लक्ष्मण सूर्यवंशी यांनी मांनले.यावेळी कार्यक्रमास उपप्राचार्य डी.डी.बच्छाव, NACC सदस्य प्राध्यापक डी.के. निकम शिक्षक शिक्षकेतर सेवक व बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleकळवणच्या सुळे गावात रेशन दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण
Next articleबालाजीराव पाटिल अंबुलगेकर यांच्या वतीने अंबुलगा (बु) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here