• Home
  • भारतीय मराठा महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

भारतीय मराठा महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210214-WA0105.jpg

भारतीय मराठा महासंघाच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. औरंगाबाद,(युवा मराठा न्युज नेटवर्क)- दि. १४ फेब्रुवारी रोजी वासंती मंगल कार्यालय, बीडबायपास येथे भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयदीप वरखींडे हे अध्यक्ष स्थानी होते.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रोहिणीताई राऊत, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वैभव नालेगावकर, मराठवाडा अध्यक्ष प्रा. दत्ता शिनगारे, जालना जिल्हा अध्यक्ष कपिल पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष ऍड.वैशाली ताई कडू पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष मेघा थोरात, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष बद्रिनाथ थोरात इ. उपस्थित होते. या प्रसंगी औरंगाबाद शहर अध्यक्ष पंडित (अण्णा) सीताराम कदम , खुल्ताबाद तालुका अध्यक्ष शिवाजीराव सूर्यभान साळूंके पाटील ,गंगापूर तालूका अध्यक्ष चंद्रशेखर अशोकराव् पाटील, औरंगाबाद (पूर्व)तालुका अध्यक्ष अनिल रावसाहेब् तांगडे , फुलम्ब्री तालुका अध्यक्ष खंडेराव असाराम जाधव, औरंगाबाद (दक्षिण) तालुका अध्यक्ष संतोष कुमार विठ्ठलराव गणोरकर, जिल्हा संघटक पदी रामदास मनगटे, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष सुरेश संतोष पवार इ. ची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष रंगनाथ लबडे, वैजापूर तालुका अध्यक्ष बबन राव पवार , संतराम कदम, रावसाहेब तांगडे, भागवत बिरादार् पाटील, अनील् गुजर, आबासाहेब भोसले,गंगाधर घायाळ, के.एम.बोडखे , सचिन नेहे, भुजंग पवार, संजय बाजीपाटील, रामेश्वर वाकडे पाटील इ.ची उपस्थिती होती.

anews Banner

Leave A Comment