Home नांदेड बालाजीराव पाटिल अंबुलगेकर यांच्या वतीने अंबुलगा (बु) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन…

बालाजीराव पाटिल अंबुलगेकर यांच्या वतीने अंबुलगा (बु) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन…

121

राजेंद्र पाटील राऊत

बालाजीराव पाटिल अंबुलगेकर यांच्या वतीने अंबुलगा (बु) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन…
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा बु येथे काँग्रेसचे नेते तथा मुखेड पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही मुस्लिम धर्मियांच्या अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिना व या महिन्यात करण्यात येणाऱ्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर दि. २४ एप्रिल रोजी आंबुलगा (बु) येथे सर्व मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बालाजीराव पाटील अंबुलगेकर ,अंबुलगा नगरीचे पोलिस पाटिल विट्ठलराव कौरवाड ,सरपंच (प्र) बालाजी रॅपनवाड, उपसरपंच शरद पाटील,अंबुलगा येथील प्रतिष्ठित व्यापारी बाबू सावकार उलीगडे ,मुसासाब शेख, पत्रकार विठ्ठल कल्याणपाड , ग्रामपंचायत सदस्य माधव मामीलवाड , सदस्य बळीराम कांबळे , सलीमसाब कुरेशी , रसूलसाब शेख ,हुसेन पठाण ,महेमुद पठाण ,अखिल शेख ,महेबुब कुरेशी ,इमाम शेख, यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी गावातील सर्व मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती . या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून बालाजीराव पाटिल अंबुलगेकर यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या .

Previous articleताहाराबाद महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात संपन्न
Next articleमुक्रमाबाद येथील जि.प.हा.शाळा येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.