Home मराठवाडा रहाटीच्या ग्रामस्थांनी द्रुतगती द्रु समृद्धी महामार्गासाठीच्या मोजणीचेकाम अडविले काही गोष्टींची स्पष्टता होईपर्यंत...

रहाटीच्या ग्रामस्थांनी द्रुतगती द्रु समृद्धी महामार्गासाठीच्या मोजणीचेकाम अडविले काही गोष्टींची स्पष्टता होईपर्यंत भूसंपादनास विरोध

188
0

राजेंद्र पाटील राऊत

रहाटीच्या ग्रामस्थांनी द्रुतगती द्रु समृद्धी महामार्गासाठीच्या मोजणीचेकाम अडविले काही गोष्टींची स्पष्टता होईपर्यंत भूसंपादनास विरोध

जिंतूर,(विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी : जालना ते नांदेड
द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या
भूसंपादनाच्या दृष्टीने सरकारी
पातळीवरील एक पथक शुक्रवारी (दि.07) मौजे रहाटी या शिवारात दाखल झाले खरे, परंतु ग्रामस्थांनी जमीन मोजणीस विरोध करीत भूसंपादनासंदर्भात प्रशासनाने स्पष्टता करावी, असे नमूद करीत ते काम अडविले.
जालना ते नांदेड
द्रुतगती समृद्धी महामार्ग
परभणी जिल्ह्यातून जाणार
आहे. या महामार्गासाठी
भूसंपादनाच्या कामासाठी काही गावांमधून सरकारी पथकांद्वारे मोजणीचे काम सुरु होणार आहे. शुक्रवारी त्या दृष्टीनेच स्थानिक मुख्य भूसंपादन अधिकारी नांदेड व जालना येथील पथकांनी मौजे रहाटी शिवारात दाखल झाल्यानंतर मोजणीच्या कामास सुरुवात केली. परंतु, त्यास सर्व शेतकर्‍यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. काही गोष्टींबाबत प्रशासनाने स्पष्टता करावी. काही मागण्या आहेत, त्या मान्य कराव्यात. अन्यथाभूसंपादनाच्या दृष्टीने मोजणीच्या कामास परवानगी दिली जाणार नाही, असे नमूद केले. दि. 06 जानेवारी रोजी प्रकाशित केलेल्या परिपत्रकात राष्ट्रीय, राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रक्कमेची परिगणना करतांना गुण घटक 1.0 राहील, असे लागू केले आहे. पण त्यास सर्व शेतकर्‍यांचा विरोध आहे. चालू वर्षानुसार रेडिरेकनर दर वाढवून मोबदल्याच्या रक्कमा
लागू झाल्या पाहिजेत, असेस्पष्ट करीत या शेतकर्‍यांनी
ही मागणी मान्य होईपर्यंत
भूसंपादनास शेवटपर्यंत विरोध राहील, असे म्हटले. दरम्यान, अजित उत्तमराव मगर, विठ्ठल रमेशराव धस, भास्कर दिगांबरराव खुळे, देविदास रुस्तुमराव खुळे, नामदेव
देवराव खुळे, रमेश सुभाषराव
धस या शेतकर्‍यांनी पंचनाम्या दरम्यान या पथकासमोर आपल्या भूमिका स्पष्ट केल्या व मोजणीच्या कामास विरोध दर्शविला. त्यामुळे या पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांना मोजणीविना परतावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here