Home बुलढाणा भिम गीत गायन स्पर्धा २०२२ चा निर्णय जाहिर

भिम गीत गायन स्पर्धा २०२२ चा निर्णय जाहिर

120
0

राजेंद्र पाटील राऊत

भिम गीत गायन स्पर्धा २०२२ चा निर्णय जाहिर
बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- जेतवन बुद्ध विहार वरवट ब येथे दि. १७ । ४ । २० २२ संपन्न झालेल्या भिम गीत गायन स्पर्धेचा निर्णय आयोजकांनी आज जाहिर केला असून ह्या मध्ये प्रथम २० हजार रु .’द्वितीय १५ हजार रु व तृतीय बक्षिस १० हजार रुपये व पाच वैयक्तीक बक्षिसाचा समावेश आहे .
ब्युरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बुलडाणा
सविस्तर वृत्त असेकी , महाकवी वामनदादा कर्डक ह्यांच्या शताब्दी वर्षानिमित बुलडाणा येथे राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य सम्मेलनाचे राज्यस्तरीय आयोजन असून ह्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वरवट ब . येथे राज्यस्तरीय भिमगीत गायन स्पर्धा घेण्याचे नियोजन भाऊ भोजने हयांच्या आयोजनात घेण्यात आले होते ह्या कार्यक्रमामध्ये २० हजार / १५ हजार / व १० हजार अशा तीन पुरस्कारा सह ५ गायन मंडळास प्रत्येकी २ हजार रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिसे जाहिर केली होती . जेतवन बुद्धाविहाराच्या प्रांगणात हा कार्यकम दि १७ एप्रिल रोजी संपन्न झाला . प्रथम बक्षिस २० हजाराचे विभागून वानखडे सर मानोरा जि . वाशिम व लिलाधर पाटोळे वाशिम ह्याना जाहिर झाले . द्वितीय क्रमांकाचे १५ हजाराचे बक्षिस इंदूमती गवई शेगाव ह्यांना तर तिसरे १० हजाराचे बक्षिस साक्षी रौदळे वानखेड हिला मिळाले असून ह्या बक्षिस वितरणचा कार्यक्रम बुलडाणा येथे गर्दे वाचणालयात दि. २३ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या महाकवी वामनदादा कर्डक साहित्य सम्मेलनात वेळ १२ -३० ते १ -३०देण्यात येणार आहे. ह्या पुरस्कारामध्ये शाल हार सर्टीफिकेट व मोमेंटो बक्षिस पात्र स्पर्धकांना ह्या साहित्य सम्मेलनाचे उद्घाटक सुप्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजूळे ह्यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रविकांत तुपकर ह्यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देण्यात येणार आहे. तर प्रोत्साहन बक्षिसे पंचशिल गायन पार्टी वरवट ब २ देवानंद मोरे ( वडोदा ) अथर्व टाकळकर ( वरवट ) अमृता गवारगुरु (पंचगव्हाण ) प्रितम उत्तम दादा फुलकर ह्यांना प्रत्येकी २ हजार रुपयाचे पुरस्कार देण्यात येणार आहेत . असे मुख्य आयोजक भाऊ भोजने ह्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे. ह्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून ४१ कलासंचानी सहभाग नोदविला होता . परिक्षक म्हणून सुभेदार सर ‘ / इंगळे सर ह्यांनी काम पाहिले . तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल इगळे, सुप्रसिद्ध गायक भगवान सिरसाट ‘ श्रीकृष्ण हातेकर ‘ मिलींद डोगरदिवे ‘ अनिल हेरोळे ‘ पंजाबराव इंगळे ‘ नागोराव इंगळे ‘ संतोष दामोदर उत्तम गवई जगन तायडे ‘ बाळीराम पारिसे आदी शाहीरांनी अथक परिश्रम घेतले .

Previous articleप्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वतीने आरोग्य सेवा प्रदान.
Next articleवानखेड ग्रामस्थांना पिण्यासाठी होतोय विषारी पाण्याचा वाटप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here