Home पुणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी शिक्षकांचा गौरव

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी शिक्षकांचा गौरव

63
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220412-WA0036.jpg

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी शिक्षकांचा गौरव
पिंपरी-चिंचवड. प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडी : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले *. श्री संजय (नाना) काटे युवा मंच* यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात *माजी नगरसेवक श्री संजय (नाना) काटे* , जय मल्हार क्रांती संघटना पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष काटे, जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव हेमंत बगणर, सहाय्यक सचिव रामेश्वर होणखांबे, निखील मते, अमित काटे, विनायक काटे, जयसिंग काटे, लक्ष्मीकांत बाराथे यांच्या हस्ते शिक्षकांना गौरविण्यात आले.

जयंती जयंत सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका पुष्पलता तिजोरे- सोनवणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ” क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागासलेल्याना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. ”

प्राचार्या अंजली घोडके, उपप्राचार्य विठ्ठल कढणे, संजय शिरसाठ, तुषार करमाळकर, दीपाली मोरे, दत्तात्रय पुजारी या शिक्षकांना माजी नगरसेवक काटे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल पाटील यांनी केले. गंगाधर पवार यांनी आभार मानले.

फोटो : दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त *माजी नगरसेवक श्री संजय (नाना) काटे* यांच्या हस्ते शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Previous articleराजकारणात माणुसकी जीवंत असलेला नेता गजानन पा. चव्हाण 
Next articleगावाचा विकास साधायचा असेल तर सरपंच हा कडक गुरूजीच हवा – माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here