Home नांदेड राजकारणात माणुसकी जीवंत असलेला नेता गजानन पा. चव्हाण 

राजकारणात माणुसकी जीवंत असलेला नेता गजानन पा. चव्हाण 

51
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220411-WA0094.jpg

राजकारणात माणुसकी जीवंत असलेला नेता गजानन पा. चव्हाण

नायगांव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)

नायगाव बाजार- दि ११ एप्रिल) वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वच जण साजरा करतात. गरीब असो वा श्रीमंत. काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र नातेवाईकांसमवेत पार्टी करतात. वाढदिवस कसाही साजरा केलात तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे असा विचार साधारणपणे करण्यात येतो असाच ३३ वा वाढदिवस नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकांना आपलंसं वाटणारं नेतृत्व तथा शांत संयमी मनमिळावू व‌ समन्वयी पण राजकारणावर मांड‌‌ असलेला नेता – मा. गजानन शंकरराव पाटील चव्हाण नायगांकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रमांनी नायगावांत साजरा करण्यात आला. गेल्या ५ वर्षातील उच्चांकी गर्दी या वर्षी चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात होती. सकाळी ८ पासून राञी ८.३० पर्यंत सलग साडेबारा तास गजानन चव्हाण यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.अनेकांनी देश स्वतंत्र आहे इथे लोकशाही नांदते असे म्हणून मिरवीत असले तरी अशा लोकांना स्वतंत्र आणि लोकशाही म्हणजे काय हे देखील माहित नाही. आपली उपजीविका भागविणे व आपल्या लेकरा बाळांसाठी दाही दिशा फिरणे, अनेकांच्या दारासमोर अपेक्षा ठेवून जाणे आणि निराश होऊन येणे, अशा या लोकांसाठी त्यांना दिशा देण्यासाठी व त्यांच्या सर्व सुखदुःखात सहभागी होऊन या व्यवस्थेपुढे त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून एका सक्षम नेतृत्वाची गरज लागते म्हणून नायगाव शहरात वेळप्रसंगी जहालमतवादी आणि वेळप्रसंगी भावनिकपणाही अंगी असलेले एक कुशल नेतृत्व, अनेकांच्या गळ्यातील ताईत सन्माननीय गजानन शंकराव पाटील चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त नायगाव शहरात विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होताना त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद रुपी बळ देण्यासाठी अनेकांनी आसुसलेले होते. अशा व्यक्तीचा जन्म योगायोग म्हणावा ज्यादिवशी श्रीरामांचा जन्म झाला त्या रामनवमीच्या पवित्र दिनी गजानन पाटील चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हा सर्व मित्र परिवारांना वेगळाच आनंद झाला दिवसेंदिवस गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्याची भरारी उंच-उंच जावी त्यांच्या कार्यामुळे आकाश देखील ठेंगणा पडावा, अशा समुद्रातल्या निखळ पाहण्यासारखी स्वच्छ नेतृत्व, निस्वार्थीपणा असलेले व्यक्तिमत्व, आमचे परममित्र एक चळवळीतील अग्रगण्य नाव,मा. गजानन पाटील चव्हाण नायगांवकर
शुभेच्छूक
सामाजिक कार्यकर्ते शिवानंद
दत्तात्रय पांचाळ नायगांवकर
सर्व मित्र परिवार नायगांव विधानसभा मतदारसंघ

Previous articleलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीरामवरदायिनी देवीची यात्रा १६ एप्रिल २०२२ रोजी
Next articleमहात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी शिक्षकांचा गौरव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here