Home अकोला मंदीर आवारातील दहाबारा वेळा जीवघेण्या हल्ला करणा-या तीन आगमोहांना काढुन मंदीर परीसर...

मंदीर आवारातील दहाबारा वेळा जीवघेण्या हल्ला करणा-या तीन आगमोहांना काढुन मंदीर परीसर सुरक्षित केला

328
0

राजेंद्र पाटील राऊत

मंदीर आवारातील दहाबारा वेळा जीवघेण्या हल्ला करणा-या तीन आगमोहांना काढुन मंदीर परीसर सुरक्षित केला                अकोला,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज वाशिम)

▶️ दिपक सदाफळे (जिवरक्षक) पिंजर यांची जिगरबाजी दुस-या माळयावर चढुन केले रेस्क्यु ऑपरेशन

▶️ अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे (जिवरक्षक) आणी त्यांचे सहकारी कीशु तायडे,गोविंदा ढोके, यांनी मोठे धाडस करुन तीन आगेमोह काढुन पुर्णपणे परीसर सुरक्षित केला यामुळे चिखलीसह मंदीरात ये-जा करणा-यांनी सुटकेचा श्वास सोडला
▶️ शेलुबाजार लगतच्या मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथील झोलेबाबा मंदीर आवारातील सभा मंडपाच्या बिल्डींगला दुस-या मजल्यावर लागलेल्या तीन आगेमोह एक दीड महिन्यापासुन लागले होते.तेव्हा पासुन या आगेमोहावरील मधमाशांनी ये-जा करणा-यांवर मधमाशांनी दोनतीन वेळा हल्ला चढविला.यात आतापर्यंत दहा-बाराजण जखमी झाले होते यातील तीन जनांना तर रुग्णालयात भरती केले होते.या पुढील एखादी मोठी दुर्घटना होऊनये म्हणून दखल घेत झोलेबाबा मंदीर संस्थानचे सचिव श्रीरामजी मांगुळकर यांनी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करण्यासाठी पाचारण केले.लगेच आज 14 मार्च रोजी सायंकाळी दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी यांनी रेस्क्यु साहीत्यासह घटनास्थळी येऊन सुरक्षितपणे तीनही आगेमोह काढुन टाकले यामुळे चिखलीसह येणा-या भाविकभक्तांना भयमुक्त केले यावेळी देवस्थान चे पदाधिकारी पत्रकार पवन राठी आणी रुग्णसेवागृपचे शिवा सावके उपस्थित होते यावेळी मंदिर समितीने जिवरक्षक दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी कीशु तेरे,गोविंदा ढोके यांचा शाल आणी श्रीफळ देऊन सत्कार केला अशी माहिती रुग्णसेवागृपचे शिवा सावके यांनी दीली आहे.

Previous articleमा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसानी दिला आदिवासी विकास करीता 9.40% बजेट तर मुख्यमंत्री मा.उध्दव जी ठाकरे सरकार आदिवासी विकास। करीता देताय 7.25%बजेट। प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणी
Next articleमहाभकास आघाडी सरकार चा व सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर विभाग मुंबई प्रशासनाचा निषेध असो
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here