• Home
  • पुण्याच्या महापौरांना रुग्णालयातून डिस्चार्ज…! पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल..🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )  

पुण्याच्या महापौरांना रुग्णालयातून डिस्चार्ज…! पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल..🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )  

🛑 पुण्याच्या महापौरांना रुग्णालयातून डिस्चार्ज…! पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल..🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. आज मोहोळ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मोहोळ यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.

कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या 15 तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली असल्याचं मोहोळ यांनी सांगतिलं आहे. तसेच मोहोळ यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे आभार मानले आहेत.

होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा 24 तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे, असं मोहोळ यांनी म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली होती. लवकर बरं होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या होत्या…⭕

anews Banner

Leave A Comment