Home गडचिरोली मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसानी दिला आदिवासी विकास करीता 9.40% बजेट तर मुख्यमंत्री मा.उध्दव...

मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसानी दिला आदिवासी विकास करीता 9.40% बजेट तर मुख्यमंत्री मा.उध्दव जी ठाकरे सरकार आदिवासी विकास। करीता देताय 7.25%बजेट। प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणी

71
0

राजेंद्र पाटील राऊत

मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसानी दिला आदिवासी विकास करीता 9.40% बजेट तर मुख्यमंत्री मा.उध्दव जी ठाकरे सरकार आदिवासी विकास। करीता देताय 7.25%बजेट।

प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणी                                             गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

1992 ला सुकथनकर समीती ने जो अहवाल सादर केला त्यात महाराष्ट्राती अनुसूचित जमाती/आदिवासी विकास करीता राज्याच्या बजेटच्या 9% निधि द्यावा अश्या सुचना दिल्या होत्या त्तत्कालीन काँग्रेस सरकारने त्या शिफारशी स्विकारल्या होत्या मात्र निधि दिला नाहि. 11 मार्च,2022 ला महाराष्ट्राचा आर्थिक बजेट मा.ना.अजीतजी पवार यानी सभागृहात मांडला 1 लाख 55 हजार करोड च्या या बजेट मध्ये महाराष्ट्रातील 1 करोड 35 लाख आदिवासी करीता 9% प्रमाणे 13 हजार 500 करोड बजेट पाहिजे होते. पण महाविकास आघाडी सरकारने 11 हजार 199 करोड म्हणजे 7.25% बजेट आदिवासी विकास करीता दिला.महाविकास आघाडी सरकारने आदिवासी विकासाचे 2301 कोटि विकास निधी 2022 च्या बजेट मध्ये हडपला.या आदिवासी बजेट मधुन.अनिवार्य व आदिवासी विभागातील कर्मचारी वेतनावर 3585.05 कोटि खर्च होतील. महाराष्ट्रातील 2880 पेसा ग्रामपंचायत करीता 5% प्रमाणे 559.95लाख निधि जाईल. म्हणजे 4143 कोटि जातील 7056 कोटि मधुन राज्य सरकार पुर्ण निधि दिला तर ठिक नाहि तर मिडेल तेव्हळा मिडेल अस समजून आदिवासी नी विकास करायचे,11 मार्च,2022 च्या बजेट मध्ये महाविकास आघाडी सरकारने आदिवासी विकास चे 2301 कोटि रुपये कमी दिले. 8मार्च2021ला महाराष्ट्राच्या 1 लाख 30 हजार करोड बजेट मध्ये आदिवासी विकास करीता 9% म्हणजे 11हजार 700 कोटि पाहिजे होते. पण प्रत्यक्षात 9738 कोटि निधि म्हणजे 7.48% च निधी दिला 2021 च्या बजेट मध्ये महाआघाडी सरकारने आदिवासी विकास चे 1962 कोटि हडप केले.2020 मध्ये पण बजेट मध्ये निधि कमी दिला व त्यातुन 67% बजेट कपात केला होता.पेसा ग्रामपंचायत ला देखील 5% निधि दिला नव्हता. महाआघाडी सरकार महाराष्ट्रातील 1 कोटि 35 लाखाच्या संख्येतील अनुसूचित जमाती/आदिवासी वर बजेट कमी करुन अन्याय करीत आहे.अस मत 11 मार्च 2022 च्या झालेल्या बजेट वर प्रतीक्रिया देताना प्रकाश गेडाम, प्रदेश महामंत्री, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मीत्र.महाराष्ट्र यानी व्यक्त केली आहे
मा.देवेंद्र जी फडणवीस महाराष्ट्र चे मुख्यमंत्री (2014 ते 2019) असताना आदिवासी विकास करीता 9.40% निधि पहिल्यांदा दिला व 1992 च्या सुकथनकर समीती च्या शिफारशी चे पालन केले
सन 2014-15 ला 4812.92 कोटि,(9.40%) सन 2015-16 ला 5170 कोटि,(9.40%) सन2016-17 ला 5357.71 कोटि,(9.40%) सन2017-18 ला 6754 कोटि,(9%)सन 2018-19 ला 8,969.5 कोटि,(9.18%) असा 31,066.13 कोटि निधी दिला
संविधान अनुसुची 5 अनुच्छेद 244 अन्वये महाराष्ट्रात पेसा मध्ये असलेल्या 2889 ग्रामपंचायत ला आदिवासी बजेट मधुन 5% निधि देन्याचा देशातील पहिला निर्णय मा.देवेंद्र जी फडणवीस सरकारने घेतला व सन 2016-17 ला 265 कोटि,सन2017-18 ला 340.कोटि, व सन 2018-19 ला 450 कोटि असा 1055 कोटि निधि दिला होता
शिवरायांच्या महाराष्ट्रात आदिवासी बजेट कपात करुन महाआघाडी सरकार महाराष्ट्रातील 11% च्या संख्येतील जनजाती/आदिवासी वर अन्याय करीत आहे

Previous articleजिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रतिभाताई चौधरी यांचा आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळ तर्फे सत्कार
Next articleमंदीर आवारातील दहाबारा वेळा जीवघेण्या हल्ला करणा-या तीन आगमोहांना काढुन मंदीर परीसर सुरक्षित केला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here