Home नांदेड सातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी पिक विमा भरता येतो

सातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी पिक विमा भरता येतो

136

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0031.jpg

सातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी पिक विमा भरता येतो
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 15 :- नांदेड जिल्ह्यामध्ये विविध समाजमाध्यमांद्वारे पिक विमा भरतांना सातबाऱ्यावर यावर्षीच्या पिकाची नोंद आवश्यक असल्याबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. त्याऐवजी अद्ययावत सातबारा व पिक पेरणीबाबत स्वयंघोषणा पत्र आवश्यक आहे. सातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी देखील पिक विमा भरता येतो.

पिक विमा नोंदणीच्या अंतिम आठवड्यामध्ये पोर्टलवर जास्त दाब येऊन पोर्टल हळू होते परिणामी पिक विमा भरताना अडचणी येतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पिक पेरणीचे (सात-बारावर पिक नोंदीची आवश्यकता नाही) स्वयंघोषणापत्र देऊन अंतिम मुदतीची वाट न बघता पिक विमा योजनेमध्ये लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

Previous articleमुखेड जाणाऱ्या रस्त्यावरील काम खानापूर फाटा येथे अर्धवट झाल्याने वाहने अडकुन रहदारीस अडथळा,
Next articleपिक विमा भरल्यानंतर ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्याचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.