Home विदर्भ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सभागृहाचे काम गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सभागृहाचे काम गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण.

266
0

राजेंद्र पाटील राऊत

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सभागृहाचे काम गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण.

अनसिंग,(मंगेश डांगे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
अनसिंग येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सभागृहाच्या कामाला तीन वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा सभागृहाचे काम आज वर्ष 2022 पर्यंत अपूर्ण आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूकेत सभागृहाला साडेतीन लाखाचा निधी मंजुर झाला होता. आजपर्यंत दीड लाखाचे काम पूर्ण झाले असून बाकीचे काम कधी पूर्ण होईल किंवा होणारच नाही असा प्रश्न आता येथील धनगर बांधवांना पडला आहे.
सभागृहाच्या बांधकामासाठी पुरेपूर निधी मंजूर असून सुद्धा काम पूर्ण झाले नाही म्हणून येथिल धनगर समाजाला धार्मिक आणि सामाजिक कामाकरिता सभागृहाचा वापर करता येत नसल्यामूळे येथिल ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
येथील धनगर समाज हा अर्धवट असलेल्या सभागृहामध्ये
अहिल्याबाई होळकर यांची जंयती असो अथवा पुण्यतिथि
नवरात्र उत्सव असो अथवा गणेश चतुर्थी यासारखे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम साजरे करत असतात येथील आयोजित कार्यक्रमासाठी येथील समाजाला सभागृहाच्या
पूर्ण कामाची अपेक्षा नेहमी भासत असते.
तरी सभागृहाच्या बांधकामाबाबत येथील धनगर समाज हा
वेळोवेळी पाठपुरावा करीत असूनसुद्धा त्यांना काम पूर्ण का होत नाही याचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here