Home विदर्भ देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड गाव येथे जोपासली...

देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड गाव येथे जोपासली जाते.

137
0

राजेंद्र पाटील राऊत

वानखेड गाव चे आराध्य दैवत माता जगदंबा
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड गाव येथे जोपासली जाते.

नदीच्या अ‍ैल व पैल तिरावर या मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. या पैकी गावाबाहेरील मंदिरात जगदंबा मातेचे महिनाभरासाठी वास्तव्य राहते. तर एक महिन्यानंतर पुन्हा देवीची स्थापना नदीच्या पलिकडील तीरावर म्हणजेच गावात केली जाते. या स्थलांतराला देवीच्या सासर-माहेराची संकल्पना दिल्या जाते. ही अनोखी परंपरा येथे वर्षानुवर्षांपासून जोपासल्या जात आहे.
सातपुड्याच्या कुशीतुन उगम पावलेल्या वान नदी तिरावर संग्रामपूर तालुक्यातील वानखेड हे गाव वसले आहे. या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेचे नदीच्या दोन्ही तिरावर दोन पुरातन मंदिर आहेत. यामध्ये पैलतिरावर असलेले मंदिर हे हेमाडपंथी आहे. शिवाजी महाराजांना प्रसन्न असलेल्या तुळजाभवानीची प्रतिमुर्ती येथे विराजमान आहे. मुळ पिठाच्या तिन्ही मुर्ती माता जगदंबेच्या रुपाने वानखेड गाव येथील मंदिरात विराजमान आहेत. या मंदिरासमोर महाद्वार असून महाद्वारालगत मातेचा दुमजली रथ ठेवण्याची जागा आहे. एका आख्यायिकेनुसार देवीच्या मूर्ती या पैलतिरावरील मंदिरात होत्या.
जगदंबा देवीचे उपासक अमृतराव देशमुख यांच्या स्वप्नात येवून प्रतिस्थापनेची आज्ञा श्री. जगदंबा मातेकडून झाली. त्यानंतर सद्यस्थित असलेल्या गावातील मंदिरात गावकऱ्यांनी त्रयमुर्तीची पुन्हा स्थापना व प्राण प्रतिष्ठा करण्यात आल्याचा इतिहास सर्वश्रृत आहे.

वानखेड येथील जगदंबा मातेच्या मंदिरात अनेक उत्सवापैकी दोन उत्सव अति हर्षोउल्हासात साजरे करण्यात येतात. यापैकी पहिला उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव होय. संपुर्ण महाराष्ट्रातून श्रध्दाळू भावीक मातेच्या दर्शनासाठी येतात. घटस्थापनेपासून अष्टमी पर्यंत दररोज मंदिरात विविध कार्यक्रमाची रेलचेल राहते. पुर्वापार ओव्या म्हणण्याचा जुना प्रघात इथे आजतागत चालु आहे.

पौष पोर्णिमेचा महत्वाचा उत्सव
वानखेड येथील दुसरा उत्सव म्हणजे पौषपौर्णीमेचा मातेचा यात्रोत्सव.

पौष पौर्णीमेला सकाळी मातेला अभिषेक आरती होवून देवीच्या मुर्तीची संपुर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक म्हणजे पालखी निघते. या पालखीच्या दर्शनासाठी हजारो भावीक वानखेड गाव येथे येतात. याच दिवशी रात्री बारा वाजता प्रभु श्रीरामचंद्राचा रथ संपुर्ण गावातुन निघून सिताहरण, कुंभ कर्ण वध, रामायण युध्द व भरतभेट असा संपुर्ण रामायणावर आधारित कार्यक़्रम सादर केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहांडी व महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम पुर्वापार पासून चालत आलेला आहे.यामध्ये उळीद. डाळ व भाकरीचा महाप्रसाद म्हणून वाढला जातो

जगदंबा मातेच्या स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here