Home विदर्भ चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर चित्रकलेच्या माध्यमातून स्वतःच्या अंगी असलेले विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवा...

चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर चित्रकलेच्या माध्यमातून स्वतःच्या अंगी असलेले विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवा —-महेंद्र ब्राम्हणवाडे

96
0

राजेंद्र पाटील राऊत

चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

चित्रकलेच्या माध्यमातून स्वतःच्या अंगी असलेले विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवा —-महेंद्र ब्राम्हणवाडे

अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंकाजी गांधी यांच्या अखिल भारतीय काँग्रेसच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने

गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अ’ गटातून प्रथम मनस्वी खेवले, गडचिरोली, द्वितीय श्रुष्ठी कुनघाडकर, कुनघाडा, तृतीय अनुष्का इंगोले आष्टी हिने पटकावला असून अनुक्रमे 2000 रु. रोख व प्रमाणपत्र सतीश विधाते, द्वितीय 1500 रु.रोख व प्रमाणपत्र दामोदर मंडलवार, तृतीय 1000 रु.रोख व प्रमापत्र सुनील चडगुलवार जिल्हा सचिव यांचे कडून प्रदान करण्यात आले. तर ‘ब’ गटातून प्रथम रोहित मडावी एटापल्ली, द्वितीय सोनू गुरनुले गडचिरोली, तृतीय अंचल खरकाटे अहेरी यांनी पटकविला असून प्रथम 3000 रु रोख व प्रमाणपत्र बी.एल.कुमरे, व्दितीय 2000 रु.रोख व प्रमाणपत्र सौ.रुपाली पंदिलवार जि.प.सदस्य तथा जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस, तृतीय 1000 रु.रोख व प्रमाणपत्र जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस यांचे कडून मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले व विजेत्यांचे कौतुक करण्यात आले.
स्पर्धेत यश आणि अपयश दोन्ही गोष्टी असतात स्पर्धेत एखाद्याला पुरस्कार मिळाले म्हणजेच तो यशस्वी झाला असे नाही तर त्याच्याही पलिकडे यश संपादन करण्याचे अनेक मार्ग आहेत म्हणून अपयशातून खचून न जाता जीवनाच्या स्पर्धेत अधिक जिद्दीने प्रयत्न करा व स्वतःच्या अंगी असलेले विचार कलेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचवा असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी स्पर्धकांना केले ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ.चंदाताई कोडवते, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपालिताई पंदीलवार, शहर अध्यक्ष सतिश विधाते, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, सचिव सुनील चडगुलवार, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अनुसूचित जाती महिला जिल्हाध्यक्ष अपर्णा खेवले, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ.मेघा सावसाकडे, शहरकार्याध्यक्ष आशीष कामडी, महासचिव घनश्याम वाढई, दामोदर मंडलवार, हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, दिवाकर मिसार, धिवरू मेश्राम, वसंत राऊत, विपुल एलट्टीवार, सुवर्णा उराडे, आरती कंगाले, मंगला कोवे, सुमन उंदिरवाडे, संगमित्रा राजवाडे, अहिल्या सहारे, शशिकला सहारे, आरती लाहेरी, रुपलता बोदले, रजनी आत्राम, उज्वला मडावी, रोहिणी मसराम, नीता वडेट्टीवार, पौर्णिमा भडके आदी पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्याभरातून एकूण 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदविले होते सर्व सहभागींना सहभाग प्रमाण पत्र देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here