• Home
  • 🛑 *पुण्यात चाचण्यांमध्ये दहा व्यक्तींमागे चारजण पॉझिटिव्ह* 🛑

🛑 *पुण्यात चाचण्यांमध्ये दहा व्यक्तींमागे चारजण पॉझिटिव्ह* 🛑

🛑 *पुण्यात चाचण्यांमध्ये दहा व्यक्तींमागे चारजण पॉझिटिव्ह* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕ पुण्यात बाधितांची संख्या आणि परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती टक्केवारी प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. गेल्या चोवीस तासांत करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 39 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

सुमारे 2 हजार 807 जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी अकराशे नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, काल 1 हजार 456 जण बरे होऊन घरी परतले; तर 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील 21 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुण्यात अत्यवस्थ रुग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी करणे हे प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 757 वर पोहोचली आहे.

शहर परिसरात विविध रुग्णालयांत 17 हजार 393 रुग्ण उपचार घेत आहेत.

यापैकी 928 रुग्ण अत्यवस्थ, तर 479 रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि 449 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. बळींची संख्या 2 हजार 832 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 लाख 532 जणांनी कोरोनावर मात केली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment