• Home
  • 🛑 *बैलाच्या जागी मुलाला जुंपल्याने द्रवली संवेदनशील मने, आणि मिळाली ही लाखमोलाची मदत* 🛑

🛑 *बैलाच्या जागी मुलाला जुंपल्याने द्रवली संवेदनशील मने, आणि मिळाली ही लाखमोलाची मदत* 🛑

🛑 *बैलाच्या जागी मुलाला जुंपल्याने द्रवली संवेदनशील मने, आणि मिळाली ही लाखमोलाची मदत* 🛑
✍️ बुलडाणा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

घाटबोरी /जि.बुलडाणा :⭕ वर्षानुवर्षे शेतात राबून उद्याच्या सोनेरी स्वप्नांची पहाट उजाडत त्यांच्या आयुष्यातील एक एक दिवस मागे सरत होता. शेतात मेहनत घ्यायची तयारी, मात्र शेतीकामासाठी बैलजोडीच नाही, उसनवारीवर गावात कुणी कितीदा मदत करणार?, कुणाकडे किती मागणी करायची? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले आणि मायलेकांनीच स्वतः बैलजोडी होऊन अख्खे शेतशिवार नांगरून काढण्यास सुरुवात केली. अनेक महिन्यांपासून स्वतःच बैलांचे काम करीत शेतात काबाडकष्ट करणाऱ्या घाटबोरी येथील मायलेकांच्या परिश्रमाला अखेर अश्रूंचे बांध फुटले आणि अमरावतीमधील देवदूत त्यांच्या मदतीला धावले. याच देवाने पाठविलेल्या देवदूतांच्या मदतीने शांताबाई सोनुने व त्यांच्या मुलाला हक्काची बैलजोडी मिळाली आणि श्रमाचे चीज झाले.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यांतर्गत येणाऱ्या घाटबोरी या लहानशा खेड्यातील शांताबाई श्यामराव सोनुने यांना तीन मुली व एक मुलगा आहे. मुलगा विजय सोनुने तीन-चार महिन्यांचा असतानाच वडिलांचे छत्र हरविले. श्यामराव शिवराम सोनुने यांचे निधन झाले. शांता सोनुने या विधवा महिलेने परिस्थितीवर मात करीत तीन मुलीचे लग्न व मुलाचे लग्न केले.

घरी ई-क्लासची भाडेपट्टी झालेली तीन एकर कोरडवाहू जमीन, राहण्यासाठी घर नाही, नशिबात अठराविश्वे दारिद्रय, अशा कठीण परिस्थितीत उघड्यावर असलेला संसार, पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात मेहनत करायची, दारात गाय-बैल नसल्याने स्वत:च बैलासारखी शेतात कामे करायची अन् अशातच यावर्षी दुबार पेरणीचा सामनासुद्धा त्यांनी केला….⭕

anews Banner

Leave A Comment