Home गडचिरोली जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कोलपल्ली येथील सेगंटी कुटुंबाची सत्वन भेट घेऊन...

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कोलपल्ली येथील सेगंटी कुटुंबाची सत्वन भेट घेऊन केली आर्थिक मदत..!! – नाल्यात पडून गट्टय्या मलय्या सेगंटी चा झाला मृत्यू..!!

140

आशाताई बच्छाव

IMG-20220913-WA0060.jpg

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कोलपल्ली येथील सेगंटी कुटुंबाची सत्वन भेट घेऊन केली आर्थिक मदत..!!

– नाल्यात पडून गट्टय्या मलय्या सेगंटी चा झाला मृत्यू..!!

अहेरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार) : तालुक्यातील कोलपल्ली येथील गट्टय्या मलय्या सेगंटी व पत्नी शेतात गेले असता शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडल्याने गट्टय्या चा मृत्यू झाला. सदर बाबा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच त्यांनी कोलपल्ली येथे मृतक गट्टय्या सेगंटी च्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली व पुढील कार्यक्रमास आर्थिक मदत केली.जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून येतात. पद असो अथवा नसो मात्र गरजू व्यक्तींना वेळीच मदतीचा हात पुढे करीत असतात. त्याचप्रमाणे कोलपल्ली येथील घटनेची माहिती मिळताच सेगंटी कुटुंबाची सांत्वन भेट घेऊन आर्थिक मदत केली.यावेळी श्रीनिवास राऊत, महेश लेकुर, लक्ष्मण आत्राम, दिवाकर आत्राम, पुरुषोत्तम आईलवार, मनोज सडमेक, पोलिस पाटिल बुच्चा आत्राम व आ.वि.स.चे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते..!!

Previous articleभाजयुमोची उद्या सप्टेंबर रोज गुरुवारला गडचिरोली येथे सर्किट हाऊसला 1.30 वाजता महत्वाची बैठक
Next articleविशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.