• Home
  • 🛑 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने-: राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे शासनाचा जाहीर निषेध 🛑

🛑 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने-: राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे शासनाचा जाहीर निषेध 🛑

🛑 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने-: राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे शासनाचा जाहीर निषेध 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे केंद्र व राज्य शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो..

अशी माहिती राष्ट्रीय मराठा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अंकुशराव शिवाजीराव पाटील होनारळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर मोर्चे निघाले अनेक समाज बांधवांनी बलिदान दिले. मराठा व कुणबी एकच असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला होता त्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांना निवेदन दिले होते.

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या काळात मराठा समाजाचा ओबीसी च्या आरक्षण न देता आर्थिक मागास दृष्ट्या निकषावर तत्कालीन राज्यपाल यांनी वटहुकूम काढून 20 टक्के आरक्षण दिले होते. तेच भाजपा-शिवसेना पक्षाच्या काळात आर्थिक दृष्ट्या दुर्लब मागास समाजाच्या आरक्षण शिक्षणात 12 टक्के व नोकरी 13 टक्के मिळाले.

केंद्र शासनाने लोकसभेत व राज्यसभेत अर्थीक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण मिळवून दिले होते तेच आरक्षण 25% ठेवले असतील तर मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली नसती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण नुकतीच स्थगिती दिली आहे.

स्थानिक स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मराठी युवक व युवतीत अस्वस्थता आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करत आहोत , असे पाटील यांनी शेवटी सांगितले.

सदर पत्रकार परिषदेत डॉक्टर आप्पासाहेब पवार राष्ट्रीय व उपाध्यक्ष राष्ट्रीय मराठा पार्टी व मुंबई अध्यक्ष.विजय कोयले नवी मुंबई अध्यक्ष. अरुण बिरादार महाराष्ट्रीयन मराठा महासंघ महिला अध्यक्ष एडवोकेट रचना ताई भालके पुणे जिल्हा संपर्कप्रमुख .संदिपान बिराजदार पुणे शहर व जिल्हाध्यक्ष. रवींद्र वेदपाठक सचिव विकास बिरादार,मनिषा कलकर्णी सोनी सामाज सेविका ,जितेंद्र पाठक समाज सेवक ,राजलक्ष्मी हडवळे नारायण गाव,त्याचप्रमाणे अनिल चौधरी प्रकाश टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment