Home Breaking News 🛑 अजित पवार म्हणतात ‘मला ऍक्शन‍” घ्यायला भाग पाडू नका :- अजितदादा...

🛑 अजित पवार म्हणतात ‘मला ऍक्शन‍” घ्यायला भाग पाडू नका :- अजितदादा पवार 🛑

115
0

🛑 अजित पवार म्हणतात ‘मला ऍक्शन‍” घ्यायला भाग पाडू नका :- अजितदादा पवार 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕ पुणेकरांना हादरवून टाकण्याइतपत कोरोना वाढतोय; हे का आणि कसे घडतेय? एवढे करूनही “रिझल्ट’ कुठेच कसा दिसत नाही? मग, तुम्ही सगळीजणं काय करताय? अशा प्रश्‍नांचा मारा करीत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर शुक्रवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यावरच न थांबता “मला मोठी ऍक्‍शन घ्यायला भाग पाडू नका,’ असा दमही पवार यांनी भरला. म्हणजे, कोरोना आटोक्‍यात न आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची गय नसेल, हेच पवार यांनी अधोरेखित केले.

दुसरीकडे, कोरोनाला रोखण्याचे नेमके उपाय आणि त्याचा “रिझल्ट’ दाखविण्याऐवजी अधिकारी; मात्र नेहमीप्रमाणे आकड्यांचा समावेश असलेले सादरीकरण करीत राहिले.

त्यावरूनही नाराजी व्यक्त करीत पवारांनी थेट कामाचा हिशेब मागितल्याने काही वेळ अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट दिसले.

पुण्यातील कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असल्याचे आकडे पुढे येऊ लागले आहेत. सध्याच्या रोजच्या तपासणीतून 30 टक्‍क्‍यांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत असल्याने महापालिका प्रशासन हदरले आहे. तर परिस्थितीत सुधारणा न झाल्यास पुणेकरांपुढे मोठे संकट उभे राहण्याची भीतीही महापालिकेला आहे.

या साऱ्या स्थितीवर अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजतल्यापासून बैठकांचा सपाटा सुरू केला. पहिल्या बैठकीत पुण्यातील स्थिती जाणून घेत, त्यावर चर्चा केली. अपेक्षेप्रमाणे कोरोनाचा टक्का घसरण्याऐवजी तो वाढल्याने बैठकीच्या सुरवातीला अजित पवार यांनी चिंता मांडली.

गेल्या पाच-सहा महिन्यांतील परिस्थितीचा उलगडा करीत, पवार यांनी अधिकाऱ्यांपुढे काही प्रश्‍न मांडले. त्यावर अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने मात्र ते चिडले आणि म्हणाले, “कामात सुधारणा झाली नाही तर, मला मोठी मोठी ऍक्‍शन घ्यावी लागेल.’ पवार यांच्या पवित्र्यावर बैठकीच्या सभागृहात काही मिनिटे पूर्णपणे शांतता पसरली आणि सादरीकरणही बाजुला केले गेले.

मुंबईतील कोरोनाची साथ ओसरली असली; तरी पुण्यात मात्र काही केल्या कोरोना रुग्ण कमी होईनासे झाले आहेत. या परिस्थितीला पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांना जबाबदार धरले जात असल्याचा सूर आहे.

त्यावरून राजकीय विरोधकही पवारांच्या दिशेने निशाणा साधत आहेत. परिणामी, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अंग मोडून काम कामे करावे लागेल, अन्यथा अजित पवारांच्या रोषाला सामोरे जावे लगेल….⭕

Previous article🛑 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने-: राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे शासनाचा जाहीर निषेध 🛑
Next article🛑 *आनंदाची बातमी……! फ्लॅट खरेदीवर आता एकही रुपयाची स्टॅम्प ड्युटी लागणार नाही* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here