• Home
  • 🛑 *आनंदाची बातमी……! फ्लॅट खरेदीवर आता एकही रुपयाची स्टॅम्प ड्युटी लागणार नाही* 🛑

🛑 *आनंदाची बातमी……! फ्लॅट खरेदीवर आता एकही रुपयाची स्टॅम्प ड्युटी लागणार नाही* 🛑

🛑 *आनंदाची बातमी……! फ्लॅट खरेदीवर आता एकही रुपयाची स्टॅम्प ड्युटी लागणार नाही* 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ ग्राहकांना एक आनंदाची बातमी आहे. आता फ्लॅट खरेदी करताना एकही रुपयाचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. एकीकडे राज्य सरकारने डिसेंबर २०२० पर्यंत तीन टक्के शुल्क माफी दिली आहे. त्यानंतर आता नरेडका या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने उर्वरीत दोन टक्क्यांचा भर स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाकाळात फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी व स्थावर मालमत्ता उद्योगाला संजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क पाचवरून दोन टक्क्यांवर आणले आहे. तसेच नरेडकोच्या सदस्यांकडून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत फ्लॅट किंवा घर खरेदीवर एक रुपये देखील मुद्रांक शुल्क लागणार नाही.नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ही देशभरातील निवासी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे. या विभागात सुमारे ४५० बिल्डर्सचा समावेश आहे. सर्वाधिक बिल्डर्स मुंबईतले आहेत.

नरेडको पश्चिमचे अध्यक्ष म्हणाले की, कोरोना संकटात सामना करण्याऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना आणखी दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

मुद्रांक शुल्क १ रुपयादेखील भरावे लागणार नाही. त्यामुळे ग्राहकांचे भरपूर पैसे वाचणार आहेत. त्यामुळे फ्लॅट खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे आणि स्टॅम्प ड्यूटीचा खर्चही वाचणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment