Home Breaking News 🛑 *शरद पवार आणि संजय राऊत चार्टर्ड विमानाने दिल्लीकडे रवाना ……! चर्चेला...

🛑 *शरद पवार आणि संजय राऊत चार्टर्ड विमानाने दिल्लीकडे रवाना ……! चर्चेला उधाण* 🛑

117
0

🛑 *शरद पवार आणि संजय राऊत चार्टर्ड विमानाने दिल्लीकडे रवाना ……! चर्चेला उधाण* 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत सुरू असलेला वाद अधिकच चव्हाट्यावर आला आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडी सरकारची नाहक बदनामी होत असल्याच्या कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना दिल्या होत्या. महापालिकेने केलेल्या कारवाईचा टायमिंग चुकला असेही ते म्हणाले होते.

तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या वादापासून दूर राहणे पसंत केले. मात्र सत्तेत सहभागी असल्याने याचा दूरगामी परिणाम पक्षाला बसू शकतो याचा विचारही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला असावा. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. तसेच हा वाद येथेच संपवावा, अशी ताकीद सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहितीही पुढे आली होती.

या सर्व घडामोडीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच स्पष्टीकरण दिले होते. शरद पवार आणि सोनिया गांधी हे मुख्यमंत्र्यांवर नाराज नसल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

मात्र आज सकाळी अचानकपणे शरद पवार आणि संजय राऊत चार्टर्ड विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. काही वेळातच ते दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यामुळे सोनिया गांधी शिवसेनेवर नाराज तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कारण १४ तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनासाठी जात असल्याचे पवार आणि राऊत यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. अधिवेशन सुरू व्हायला अजून तीन दिवस शिल्लक असताना अचानक आजच दिल्लीत का जावे लागले, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांच्या घडामोडीवरून महाविकास आघाडीत आलबेल नाही, अशी चर्चा सुरू होतीच. त्यातच आता पवार आणि राऊतांच्या दिल्लीवारीवरून शंका उपस्थित होत आहे.

आज किंवा उद्या दोन्ही नेत्यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यास आघाडीत आलबेल नसल्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते…..⭕

Previous article🛑 *आनंदाची बातमी……! फ्लॅट खरेदीवर आता एकही रुपयाची स्टॅम्प ड्युटी लागणार नाही* 🛑
Next article🛑 *झेड, वाय, झेड प्लस…..! VIP लोकांना दिल्या जाणाऱ्या सिक्युरिटींचे प्रकार जाणून घ्या!* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here