राजेंद्र पाटील राऊत
मातेने नवजात बालिकेला स्मशानभूमीत फेकले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना.
नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड शहरातील बारव गल्ली येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका स्मशानभूमीत गुरूवार दि . ३० डिसेंबर रोजी सायंकाळी आठ ते नऊ च्या दरम्यान एका अज्ञात मातेने नुकत्याच जन्म घेतलेल्या स्त्री जातीच्या नवजात बाळाला गाजर गवतात टाकून पलायन कैले . यादरम्यान बारव गल्लीतील पप्पु उर्फ ( नागेश ) चिंतमवाड हे कामानिमित्त त्या ठिकाणाहून जात असताना एका लहान बाळाचा आवाज त्यांच्या कानी पडला . त्यांना नवजात बाळ दिसले . त्यांनी त्या बाळाला जवळ घेतले . शिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाड व योगेश मामीलवाड यांनी घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला दिली . नवजात बालिकेस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . बालिकेची तब्येत सध्या स्थिर असल्याचे कळते . मात्र अद्यापही त्या निर्दयी मातेचा शोध लागू शकला नाही . उपजिल्हा रूग्णालयात वैधकिय अधिकारी डॉ . शिंदे हे त्या मुलींवर उपचार करत आहेत . याघटनेची माहिती पोलिसांना मिळताच मुखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक केंद्रे , पोलिस उपनिरिक्षक गजानन काळे यांनी घटनास्थळी भेट दिली . याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..