Home नांदेड मातेने नवजात बालिकेला स्मशानभूमीत फेकले;माणुसकीला काळीमा फासणारी घटना

मातेने नवजात बालिकेला स्मशानभूमीत फेकले;माणुसकीला काळीमा फासणारी घटना

262
0

राजेंद्र पाटील राऊत

मातेने नवजात बालिकेला स्मशानभूमीत फेकले. माणुसकीला काळीमा फासणारी घटना.
नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड शहरातील बारव गल्ली येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका स्मशानभूमीत गुरूवार दि . ३० डिसेंबर रोजी सायंकाळी आठ ते नऊ च्या दरम्यान एका अज्ञात मातेने नुकत्याच जन्म घेतलेल्या स्त्री जातीच्या नवजात बाळाला गाजर गवतात टाकून पलायन कैले . यादरम्यान बारव गल्लीतील पप्पु उर्फ ( नागेश ) चिंतमवाड हे कामानिमित्त त्या ठिकाणाहून जात असताना एका लहान बाळाचा आवाज त्यांच्या कानी पडला . त्यांना नवजात बाळ दिसले . त्यांनी त्या बाळाला जवळ घेतले . शिवसेना शहरप्रमुख शंकर चिंतमवाड व योगेश मामीलवाड यांनी घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला दिली . नवजात बालिकेस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . बालिकेची तब्येत सध्या स्थिर असल्याचे कळते . मात्र अद्यापही त्या निर्दयी मातेचा शोध लागू शकला नाही . उपजिल्हा रूग्णालयात वैधकिय अधिकारी डॉ . शिंदे हे त्या मुलींवर उपचार करत आहेत . याघटनेची माहिती पोलिसांना मिळताच मुखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक केंद्रे , पोलिस उपनिरिक्षक गजानन काळे यांनी घटनास्थळी भेट दिली . याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Previous articleठेंगोडा ग्रामपंचायतीचा अजब कारभार,अनाथ मुली वा-यावर;दतक घेतांना नियमांचे उल्लंघन व पायमल्मली..!
Next articleनायगाव येथील एका युवकास रामतीर्थ पोलिसांनी केली अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here