Home उतर महाराष्ट्र गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट करू नये; अन्यथा आंदोलन : बोडके.

गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट करू नये; अन्यथा आंदोलन : बोडके.

107
0

राजेंद्र पाटील राऊत

गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट करू नये; अन्यथा आंदोलन : बोडके
निफाड (पिंपळगाव बसवंत)- सागर कटाळे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी                         निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन थकीत बिलांअभावी कनेक्शन कट करण्याची धमकी महावितरणकडून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नये अशी आग्रही मागणी करत करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना आक्रमकपणे मांडत तीव्र जणआंदोलनाचा इशारा दिला. वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर व कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांच्या उपस्थितीत चितेगाव फाटा येथील कुलस्वामिनी लॉन्स येथे शेतकऱ्यांचा ग्राहक संवाद मेळावा झाला.यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.गोदाकाठचे शेतकरी अस्मानी संकटामुळे उध्वस्त झाले असून थकबाकी वसुलीमुळे त्रस्त झाल्याचे विशद करत आक्रमक भूमिका मांडली.चालू बिले भरण्यास शेतकरी तयार असून थकीत बिलांसाठी तगादा लावल्यास टाळे लावा आंदोलनाचा इशारा यावेळी बोडके-पाटील यांनी दिला.

Previous articleआमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
Next articleसासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here