Home कोल्हापूर धैर्यशील माने यांना माजी खासदार करणार: जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव.

धैर्यशील माने यांना माजी खासदार करणार: जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव.

159
0

आशाताई बच्छाव

IMG-20221004-WA0007.jpg

धैर्यशील माने यांना माजी खासदार करणार: जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव.

पेठ वडगाव राहुल शिंदे: राज्यातील सरकार बदलामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू झाला आहे.याचं वार् जिल्ह्यात व तालुक्यात आलआहे.याचा प्रत्यय म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) वरील शासकीय नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.त्यानंतर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी माने आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या घरावर मोर्चे काढले होते.हे मोर्चे जाधव यांच्या अंगाशि आल्याचे दिसून येते. यावेळी मुरलीधर जाधव यांनी माध्यमांसमोर आपला संताप बोलून दाखवला.ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण सुरू झालेल आहे.त्यातील एका शिवसैनिकाचा बळी गेला आहे.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांनी दुग्ध विकास मंत्री याकडे माझे पद रद्द व्हावे यासाठी तक्रार केली. मी माझ्या ठिकाणी योग्य आहे.मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.जाधव यांची गोकुळ वरील शासकीय नियुक्ती रद्द करण्यात आल्यामुळे आमदार धैर्यशील माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे.खासदार धैर्यशील माने यांना माजी खासदार केल्याशिवाय राहणार नाही.हे सांगत त्यांनी संतप्त व्यक्त केला आहे.शिवसैनिक हे पद गोकुळच्या संचालका पेक्षा मोठ असल्याचे जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here