Home गुन्हेगारी युवा मराठाचे बाळासाहेब निकम हल्लाप्रकरण ;अखेर गावगुंडावर गुन्हा दाखल! कुणाचाही अन्याय खपवून...

युवा मराठाचे बाळासाहेब निकम हल्लाप्रकरण ;अखेर गावगुंडावर गुन्हा दाखल! कुणाचाही अन्याय खपवून घेतला जाणार नाही!-राजेंद्र पाटील राऊत

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20221004-WA0019.jpg

युवा मराठाचे बाळासाहेब निकम हल्लाप्रकरण ;अखेर गावगुंडावर गुन्हा दाखल!
कुणाचाही अन्याय खपवून घेतला जाणार नाही!-राजेंद्र पाटील राऊत
कळवण,(शांताराम गायकवाड)-युवा मराठा न्युजचे कळवण तालुका प्रतिनिधी बाळासाहेब निकम यांचेवर दि.३ आँक्टोबर रोजी रवळजी गावी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आज मंगळवारी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाने कळवण येथे निवेदने दाखल करीत तीव्र निषेध केला.
महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आम्ही यापुढे कुणाचाही अन्याय खपवून घेणार नाही.जशास तसे उतर दिले जाईल.बाळासाहेब निकम यांचेवरील हल्लेखोराना तात्काळ अटक न केल्यास १२ आँक्टोबर पासून तहसील कार्यालय कळवण येथे आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.दरम्यान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी कळवण पोलिस स्टेशनला भेट देताच गावगुंड भास्कर भिका भालेराव व त्याच्या टोळभैरवाविरुध्द दंगलीचा व अँट्रासिटी भा.दं.वि.कलम १४३,१४७,१४९,३२३,आणि अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी महासंघाने निवेदनाव्दारे केली आहे.यावेळी वरिष्ठ उपसंपादक आनंद नागमोती,विजय बागुल प्रतिनिधी डांगसौंदाणे,संभाजी वाघ प्रतिनिधी मोकभणगी,शांताराम गायकवाड प्रतिनिधी दळवट आदीजण बहुसंख्येने हजर होते.

Previous articleधैर्यशील माने यांना माजी खासदार करणार: जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव.
Next articleविचारांच सोन लुटूया!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here