Home उतर महाराष्ट्र सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या

428
0

राजेंद्र पाटील राऊत

सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या
निफाड : सागर कटाळे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी                                                       महिला सरपंचाने राहत्या घरी विषारी औषधीचे सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द या गावातली ही धक्कादायक घटना आहे. ग्रामपंचायतच्या विद्यमान महिला सरपंच योगीता अनिल फापाळे यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. त्यानंतर योगीता यांच्या पतीने त्यांना उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु तपासणी दरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला होता. मयत महिला सरपंचाच्या भावाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार योगिता सरपंच झाल्या पासून माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करण्यात येते होता.सौ,योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरुण पती अनिल बाबासाहेब फापाळे, सासरे बाबासाहेब फापाळे, सासु सरला फापाळे आणि दिर प्रदीप फापाळे या चौघांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करित आहे.

Previous articleगोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट करू नये; अन्यथा आंदोलन : बोडके.
Next articleपत्रकार राजेंद्र पाटील राऊत लवकरच घेणार निराधार निराश्रीत मुलगी दतक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here