Home पुणे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर...

आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

104
0

राजेंद्र पाटील राऊत

.
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर आज (दि.२३ नोव्हेंबर) दुपारी पावणे तिनच्या सुमारास तीन अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या फेकण्याची घटना घडली आहे . मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पिंपळेगुरव येथे ही घटना घडली . यात कोणतीही वित्त किंवा मनुष्य हानी झालेली नाही . याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे .
आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास एका दुचाकी वाहनावरून तिघेजण चंद्ररंग डेव्हलपर्स या शंकर जगताप यांच्या कार्यालयासमोर थांबले . त्यातील दोघांनी कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या . आणि त्यानंतर ते अज्ञात तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपळे गुरव येथील पेट्रोलपंपाजवळ माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे ‘ चंद्ररंग ‘ डेव्हलपर्सचे कार्यालय आहे .

हल्यामागील कारणांचा तपास सुरू आहे . या घटनेनंतर ताडतीने पोलीस पथक दाखल झाले असून, त्यांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता , त्यात एका गाडीवर तिघांनी येऊन बाटल्या फेकल्याचे फुटेज मध्ये दिसत आहे . तसेच आलेल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर काळे फासल्याचे दिसून आले . त्यानंतर सहाच्या सुमारास आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घटनास्थळास भेट दिली आहे . तसेच शहरात नाकेबंदी केली आहे . तपासासाठी पाच पथके तयार केल्याचे पोलीसांनी सांगितले . असून आरोपींना शोधून काढण्यात पोलीस पथक यशस्वी होईल असे या तपास कार्यातून प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले, आमचा कोणावरही सवंशय नाही, तसेच कार्यकत्यांनी संयम ठेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here