Home विदर्भ नक्षलग्रस्त भागात कार्यरत विशेष कृती दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ४ हजार प्रमाणे थकबाकीसह...

नक्षलग्रस्त भागात कार्यरत विशेष कृती दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ४ हजार प्रमाणे थकबाकीसह कमांडो भत्ता द्या आमदार डॉ देवरावजी होळी यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी

113
0

राजेंद्र पाटील राऊत

नक्षलग्रस्त भागात कार्यरत विशेष कृती दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा ४ हजार प्रमाणे थकबाकीसह कमांडो भत्ता द्या

आमदार डॉ देवरावजी होळी यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी

सन २०१४ पासून थकीत असलेला दरमहा रुपये ४ हजार प्रमाणे कमांडो भत्ता देण्याची केली मागणी

C-60 कर्मचाऱ्यांप्रमाणेच विशेष कृती दलातील जवानांनाही करावे लागतात जोखमीची कामे                                          गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या कृत्यास आळा घालण्यासाठी सी-६० व विशेष कृती दल कार्यरत आहेत.मात्र सी-६० जवानांना ज्याप्रमाणे ४ हजार कमांडो भत्ता देण्यात येतो त्याप्रमाणे विशेष कृती दलात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांना दिला जात नाही . त्यामुळे त्यांनाही सी -६० जवानाप्रमाणे ४ हजार कमांडो भत्ता २०१४ पासूनच्या थकबाकीसह देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.

विशेष कृती दलाचे मुख्यालय नागपूर येथे असून कार्यरत कर्मचारी यांची नियुक्ती गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी करण्यात आलेली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सध्या मिळणार्‍या प्रवास भत्ता हा त्यांचे साप्ताहिक सुट्टी व रजेचे दिवस भरून देण्यात येतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेहमी मासिक रुपये ३ हजार न मिळता कर्तव्यावर जेवढे दिवस असतात तेवढ्याच दिवसाचा प्रवास भत्ता मिळतो
सी-६० जवानांप्रमाणे विशेष कृती दलातील जवानांनाही अती दुर्गम नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद विरोधी जोखमीची कामे करावी लागतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सी-६० दलातील जवानांना ४ हजार रुपये कमांडो भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे या जवानांनाही कमांडो भत्ता २०१४ पासुनच्या थकबाकीसह देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली

Previous articleवाघाच्या हल्यात महिला जागीच ठार, वनविकास महामंडळाच्या पोरला वनातील घटना।
Next articleआमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here