Home विदर्भ भगवान बिरसा मुंडा सह तीन पुतळ्यांचे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते लोकार्पण..!!

भगवान बिरसा मुंडा सह तीन पुतळ्यांचे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते लोकार्पण..!!

76
0

राजेंद्र पाटील राऊत

भगवान बिरसा मुंडा सह तीन पुतळ्यांचे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते लोकार्पण..!!                                                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आलपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून पुतळ्याचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे हस्ते करण्यात आले. सर्व प्रथम आदिवासी सांस्कृतिक व परंपरेनुसार मिरवणूक काढून जिल्हा परिषदचे अध्य्क्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा, धर्मगुरु पाहादी पारी कुपारलिंगो व संगीत सम्राट हीरा सुका यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी मरस्कोले (अध्यक्ष ऑप्रोट संगठना महाराष्ट्र राज्य) हे होते. उद्धघाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनोहर मेश्राम, मधुसूदन कोवे, महेंद्र कुलसंगे, विनोद गुरुदास मडावी, सलीम शेख हे उपस्थित होते.तर विशेष अतिथी म्हणून दिनेश मडावी, विलास कोडाप, परब्रमन्द मडावी होते.
उद्घाटनिय स्थानावरून बोलतांना जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले कि, ब्रिटीशाविरुद्ध स्वतंत्र लढ्यात बिरसा मुंडा यांची महत्वपूर्ण भूमिका होती.आदिवासी समाजात जल, जंगल, जमिनीसाठी तसेच आदिवासींचा हक्क, स्त्री स्वातंत्र्य,मानवी प्रतिष्ठेसाठी भगवान बिरसा मुंडा यांनी लढा दिला होता. तसेच आदिवासी समाजक्रांतीचे जनक प्रथम क्रांतिकारी इग्रजांचा कर्दनकाळ जननायक उलगुलानचे जनक भगवान बिरसा मुंडा, धर्मगुरु पाहादी कुपारलिंगो व संगीत सम्राट हीरा सुका यांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष रघुनाथ तलांडे,सचिव राजेन्द्र पेंदाम, पुरुषोत्तम गेडाम,शंकर येरमे,विठ्ठल पेंदोर, वशीलकुमार मोकाशी,दत्तुजी मडावी, विश्वनाथ कोवे, वसंत आलाम यांनी परिश्रम घेतले. व सदर कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here