Home नांदेड युवकांनी भाजपात येवून स्वतःची ओळख निर्माण करावी ; अशोक कांबळ देगलूरकर

युवकांनी भाजपात येवून स्वतःची ओळख निर्माण करावी ; अशोक कांबळ देगलूरकर

129
0

राजेंद्र पाटील राऊत

युवकांनी भाजपात येवून स्वतःची ओळख निर्माण करावी ; अशोक कांबळ देगलूरकर

नांदेड, दि.२३ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

सध्या देगलूर शहरा मध्ये राजकीय वारसा असलेल्या व घराणे शाहीतील लोकांनाच राजकारणात समोर (जाणून बुजून) करत आहेत, ज्यांची ओळख भ्रष्टाचारातून करोडो रुपये उभा करणे व त्या मिळवलेल्या पैशांतून निवडणुका लढवणे व जिंकणे अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
हा भ्रष्टाचार रुपी आजार पूर्णता संपवण्यासाठी युवकांनी कोणाच्या मागे फिरून आपली वेळ व बुद्धी वाया घालवण्या पेक्षा भारतीय जनता पार्टी मध्ये सामील होऊन राजकारणाच्या मुख्य प्रवाहात यावे व देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा बहुमताचे सरकार स्थापन करण्याची संधी देशातील आपल्या सारख्या लोकांनी दिले आहे. यामध्ये सुद्धा कामावर विश्वास ठेवून राज्यात विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा भारतीय जनता पार्टीला दिले आहेत त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकसभेची जागा व विधानसभेच्या तीन जागा वर मतदारांनी विश्वास दाखवला आहे.
नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत तर चक्क माजी मुख्यमंत्र्यांनाच पराभूत करत प्रतापराव पाटील चिखलीकरांनी भाजी मारली.
व पर्वाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने युवकांना संधी देऊन जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा बहुमान मिळवला आहे असेही यावेळी कांबळे म्हणाले.
तर देगलूर येथे पुढील काळात होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना भारतीय जनता पार्टी नेतृत्व करण्याची संधी देऊ शकते तरी “येऊ का नाही, असे म्हणत कोणत्याही भूलथापांना युवकांनी बळी न पडता भारतीय जनता पार्टीत सामील होऊन आपल्या कर्तृत्वाला एक दिशा देऊन आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी असे देगुलूर भाजपचे यू.मो.चे शहराध्यक्ष अशोक कांबळे देगलूरकर यांनी युवकांना आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here