• Home
  • मुंडेवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली विश्वास पाटील नागरे यांचा कडे मागणी

मुंडेवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली विश्वास पाटील नागरे यांचा कडे मागणी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210123-WA0206.jpg

मुंडेवर खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली विश्वास पाटील नागरे यांचा कडे मागणी

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

मुंबई, दि.२३ – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना रेणू शर्माच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
धनंजय मुंडे यांच्या वर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने त्यांच्या वरील तक्रार मागे घेतली.
काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
पण अचानक हा आरोप तिने मागे घेतला.
या प्रकारा नंतर भाजपा च्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या आक्रमक झाल्या असून त्यांनी या संधर्भात मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली आणि महत्त्वाची मागणी केली.
धनंजय मुंडें वर झालेला अत्याचाराचा आरोप धक्कादायक होता.
पण ज्या पद्धतीने तक्रार मागे घेतली गेली, ते देखील तितकंच धक्कादायक आहे, असं मत वाघ यांनी व्यक्त केलं होतं.
“मुंबई पोलिस सहआयुक्तांची भेट घेत खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा वर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी केली.
हे प्रकरण मुंडे व रेणू शर्मा पुरते मर्यादित नसून यात योग्य कारवाई झाली नाही,
तर याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकी – बाळींना भोगावे लागतील.
त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी”, अशी मागणी केल्याचे ट्विट चित्रा वाघ यांनी केले.

anews Banner

Leave A Comment