राजेंद्र पाटील राऊत
नांदेड जिल्ह्याने साहित्य क्षेत्रातील भगवानराव नावाचा हिरा गमावला..
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर
मुखेड प्रतिनिधी/मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क
नांदेड जिल्ह्याचे साहित्य क्षेत्रातील वैभव म्हणून नरसी येथील माझे सहकारी मा.भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुःख झाले.
भगवानराव पाटील भिलवंडे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते.मागेही त्याच्यावर किडणीचा आजार झाला होता पण त्यांनी त्यावर मात केली होती.नरसी या गांवाला व्यापारी.दळणवळण व्यवस्थेत अग्रगण्य करण्यात भगवानरावजी याचे खुप मोठे योगदान आहे,त्यानी नरसी बसस्थानकासाठी दिलेली विनामूल्य जागा म्हणजेच त्याच्यातील दानधर्म करण्याचा खुप मोठा गुण दिसुन आला,त्यानी अनेक पदे भुषवली पण कधीही पदाचा गैरवापर केला नाही.सामाजिक.राजकीय.शैक्षणिक.व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मंडळी भगवानराव यांच्या सानिध्यात आली.अगदी साधी राहाणी.व शुद्ध विचारधारा व चारित्र्यसपन्नं जिवन त्यांनी आत्मसात केले.भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील खंरा हिरा गमावला आशी दुःखद भावना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.