राजेंद्र पाटील राऊत
🛑 मुंबई (परळ )एसटी कर्मचारी संपास – मनसे विधी विभागाचा कायदेविषयक पाठिंबा 🛑
✍️ मुंबई : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत सपांस पाठिंबा दिलेला असून त्याच अनुषंगाने आज जनहित कक्ष आणि विधी विभागाचे अध्यक्ष ऍड किशोरभाऊ शिंदे यांच्या सूचनेनुसार , महाराष्ट्र राज्य कनिष्ट वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटना यांच्या प्रतिनिंधी समवेत ऍड कीर्ती कुमार शिंदे यांच्या सह मिटिंग घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी आणि न्यायालयीन कामकाजाची चर्चा करण्यात आली
या प्रकरणाची सकाळी -१० हायकोर्टात सुनावणी असणार असून याच पार्श्वभूमीवर मुंबईतील परेल एस टी डेपो येथे वकिलांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन काही संबंधित कर्मचाऱ्यांशी मागण्यानं बाबत चर्चा करून त्यांना कायदेशीर पाठिंब्या साठी आश्वस्त केले.
विधी विभागाच्या शिष्टमंडळात विधी विभागाचे सरचिटणीस डॉ. ऍड. संतोष सावंत, ऍड अनिल गजने, ऍड रविंद्र पाष्टे, उपाध्यक्ष महेंद्र धनावडे, ऍड वसंत प्रभू , ऍड प्रांजल जाधव, ऍड सत्यम आचार्य, ऍड नितीश सोनवणे, ऍड तिलकपुरे, ऍड कोजल कदम, ऍड रीमा मौर्या, ऍड सुमीत घाग, ऍड. सुचेता नातू , निखिल सावंत आदी उपस्थित होते.⭕