Home नांदेड बहाद्दरपुरा येथे भाई गणपतराव देशमुख वाचन कक्षाचे पाडव्यारोजी उदघाटन – भाई कुरूडे

बहाद्दरपुरा येथे भाई गणपतराव देशमुख वाचन कक्षाचे पाडव्यारोजी उदघाटन – भाई कुरूडे

115
0

राजेंद्र पाटील राऊत

बहाद्दरपुरा येथे भाई गणपतराव देशमुख वाचन कक्षाचे पाडव्यारोजी उदघाटन – भाई कुरूडे

नांदेड ब्युरो चीफ/ राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

 

कंधार – बहादरपुरा येथील कै. उल्हास कुरूडे सार्वजनिक वाचनालयात शेकाप पक्षाचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख वाचन कक्षाचे स्थापन करण्यात आले आहे. दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाडव्याच्या मुहूर्तावर या वाचन कक्षाचे उद्घाटन समारोह होणार असल्याचे भाई कुरूडे यांनी कळविले.

उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार च्या वतीने तालुक्यातील पाच ते सहा गावात ग्रामीण वाचनालय चालू आहे. तर बहादरपुरा फुलवळ, घोडज, पांगरा आदी गावात हे वाचनालय आज घडीला चालत आहे बादरपुर येथील वाचनालय ग्रामपंचायत च्या वरच्या मजल्यावर चालू आहे. त्यामुळे वृद्ध व अपंग महिलांना जीनावर चढून जाण्यास अवघड जात असल्याने माजी आमदार भाई गुरूनाथरावजी कुरूडे यांनी त्यांच्या सुलोचना या निवासस्थानासमोर प्रकाश कुरुडे यांच्या जागेत भाई गणपतराव देशमुख वाचन कक्षाचे स्थापन करून वृद्ध अपंग व महिलांची वाचनाची सोय केली आहे तर यापुढे याच जागेत वाचनालयाचे कार्यालय राहणार आहे.

तरी या वाचन कक्षाच्या कार्यक्रमाचे पाडव्याच्या मुहूर्तावरील औपचारिक उद्घाटन माजी आमदार भाई कुरूडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर नांदेडचे ग्रंथालय अधिकारी प्रतापराव सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे.

तरी यावेळी या कार्यक्रमास माजी आमदार भाई गुरूनारावजी कुरूडे साहेब (सचिव श्री.शि.मो.ए.सो.कंधार), गोदावरीबाई गायकवाड (सरपंच बहादरपुरा), सौ. संजीवनीताई कुरडे (माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड.) श्री हनुमंत माधवराव पा.पेटकर (उपसरपंच बहादरपुर), श्री सुधीर गुरुनाथराव कुरुडे (उपमुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल नांदेड) व श्री दत्तात्रयराव एमेकर (माजी ग्रंथपाल) हे प्रमुख पाहुणे तर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून राहतील.
तसेच या कार्यक्रमास बहादरपुरा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन कै. उल्हास कुरूडे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष भाई दत्तात्रय गुरूनाथरावजी कुरूडे, वाचनालयाचे सचिव प्रदीप इंदुरकर सर व तसेच ग्रंथपाल संजय एमेकर यांनी केले आहे.

Previous articleसभापती कै.शिवाजी विठ्ठलराव नागमवाड यांच्या स्मरणार्थ अंबुलगा बु.येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
Next articleपिंपळगाव नगरीत पंकजा मुंडे यांचे आगमन…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here