Home भंडारा महिला नटून थटून आल्या तर पुरुष डोक्यावर, दाढीवर डाय करत आले- हास्यविनोदी...

महिला नटून थटून आल्या तर पुरुष डोक्यावर, दाढीवर डाय करत आले- हास्यविनोदी अभिनेता भारत गणेशपुरे

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20240304_203056.jpg

महिला नटून थटून आल्या तर पुरुष डोक्यावर, दाढीवर डाय करत आले- हास्यविनोदी अभिनेता भारत गणेशपुरे

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 चे पुरस्कार सोहळा सामाजिक न्याय भवन भंडारा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींचे माया टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींकडून स्वागत गीत व शिवरायांच्या जीवनावर आधारित एकच राजा इथे गाजला या गीतावर नृत्य सादर करीत अतिथींचे स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रजलन करून सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय ऍड किशोर लांजेवार होते, तर मुंबई बॉलीवूडचे प्रसिद्ध सिने हास्य कलाकार व अभिनेते भारत गणेशपुरे, संविधान बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्ने, महाराष्ट्र इमारत व कामगार कल्याण समितीचे सदस्य मार्तंडराव भेंडारकर, शिवराम गिरीपुंजे, ज्येष्ठ साहित्यिक नाशिक चवरे तथा महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक शशिकांत भोयर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
विदर्भातील विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सरपंच, उपसरपंच, युवा नेते यांचा अतीथिंच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाप्रसंगी हास्य अभिनेते भरत गणेशपुरे यांनी चला हवा येऊ द्या या काम कार्यक्रमातील काही विनोदी गप्पा मंचावर करीत उपस्थितांचे मन जिंकले. आलेल्या महिलांना लपून-छपून व नटून थटून आलेल्या महिला म्हणतच सभागृहात उपस्थितांमध्ये हास्यकिल्लोड निर्माण झाला. तसेच पुरुषांची देखील कौतुक करताना डोक्यावर दाढी मिशी पंढरी झाली आहे परंतु ती काळी दिसावी म्हणून डाय लावून आलेले आजचे युवक तरुण म्हणत त्यांची ही थट्टा केली.
सदर वेळी एड. किशोर लांजेवार यांनी पत्रकारांनी अन्ययग्रस्तांसाठी आपला लढा तीव्र करावा, अन्यायग्रस्तला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खरा अंकुश लावण्याचा काम देखील पत्रकारच करू शकतात असे मत मांडले. तसेच संविधान बचाव संघर्ष समितीचे कार्यध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे तथा बांधकाम कामगार महामंडळाची अशासकीय सदस्य मार्तंडराव भेंडारकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक शशिकांत भोयर यांनी केले, यावेळी त्यांनी सांगितले की विदर्भातील प्रतिभावंत सत्कार मूर्तींचे सत्कार केल्याने सत्कार करणाऱ्यांचे त्यांचे मनोबल वाढते व ते अधिकच जोमाने लोकांच्या मदतीला धावून जातात.
सदर सोहळ्याला भंडारा राज्य प्रतिनिधी मदन कमाणे, गोंदिया राज्य प्रतिनिधी मोहन तवाडे विदर्भ प्रतिनिधी सचिन बनसोड, गडचिरोली राज्य प्रतिनिधी कैलास बुरांडे, विदर्भ प्रतिनिधी संजय मानकर, नागपूर राज्य प्रतिनिधी छबिलाल गिरीपुंजे, विदर्भ प्रतिनिधी राजहंस शेंडे, चंद्रपूर जिल्ह्यातील तथा तालुका प्रतिनिधी अमृतलाल चरडे, धर्मेंद्र भुते, रशीद कुरेशी, नम्रता बागडे, विनोद प्रधान, अनिल टेंभुर्णी, अमोल खोब्रागडे, शीतल ठाकरे, तथा मोठया संख्येत पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here