Home माझं गाव माझं गा-हाणं पिंपळगाव नगरीत पंकजा मुंडे यांचे आगमन…

पिंपळगाव नगरीत पंकजा मुंडे यांचे आगमन…

91
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपळगाव नगरीत पंकजा मुंडे यांचे आगमन…
निफाड-सागर कटाळे युवा मराठा न्यूज चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी                                                             पिंपळगाव बसवंत येथे मुंबई आग्रा हायवे लगत असलेले चिंचखेड चौफुली येथे भाजपच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत या प्रसंगी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, त्यात महिलांनी ओवाळणी करून नामदार पंकजा मुंडे यांचे स्वागत केले ,तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सोमवारपासून विविध विकास कामांचे उदघाटन करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर असताना पिंपळगाव येथे जनतेच्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पुढे चांदवड कडे रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाल्या

Previous articleबहाद्दरपुरा येथे भाई गणपतराव देशमुख वाचन कक्षाचे पाडव्यारोजी उदघाटन – भाई कुरूडे
Next articleताहाराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवाला दौलत माळी यांची बिनविरोध निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here