राजेंद्र पाटील राऊत
व-हाणेत रोटरमध्ये अडकून
तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सर्वत्र हळहळ
जळगांव (निं.),(विशाल बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-मालेगांव तालुक्यातल्या व-हाणे येथील वैभव साहेबराव शेलार वय २० वर्ष या तरुणाचा रोटरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.
वैभव शेतात कचरा वेचत असताना त्याला रोटरचा धक्का लागला.यात तो गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने मालेगांवच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डाँ.बोरसे यांनी तपासणीअंती मृत घोषित केले.काल सोमवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.याप्रकरणी मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.