Home विदर्भ सुरजागड रॉलीमध्ये सहभागी होणार्या दोन नक्षंलवाद्यानां गडचिरोली पोलिस दलाकडुन अटक: शासनाने जाहिर...

सुरजागड रॉलीमध्ये सहभागी होणार्या दोन नक्षंलवाद्यानां गडचिरोली पोलिस दलाकडुन अटक: शासनाने जाहिर केले होते 04 लाख रुपयाचे बक्षिस सुरजागड आंदोलन गालबोट:

135
0

राजेंद्र पाटील राऊत

सुरजागड रॉलीमध्ये सहभागी होणार्या दोन नक्षंलवाद्यानां गडचिरोली पोलिस दलाकडुन अटक: शासनाने जाहिर केले होते 04 लाख रुपयाचे बक्षिस सुरजागड आंदोलन गालबोट: गडचिरोली :(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) पोलिस उपविभाग एटापल्ली अंतरगत येणार्या एटापल्ली हद्दित दिं.26 ऑक्टोंबर 2021 रोजी सामान्य नागरिकांच्या वतिने सुरजागड उत्खनाच्या अंनुषंगाने रॉली काढण्यात आली, शांतता पुर्वक चालु असलेल्या रॉलिमधे काही नक्षल सामिल असल्याबाबत ,गोपनिय सुञाकडुन मिळालेल्या विश्वासनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली जवान, रॉलिच्या सुरक्षेकरिता गोपनीय पध्दतीने तैनात असलेल्या जहाल नक्षली मुडी मासा झाही याच्यासह जनमिलिशिया सदस्य मैनु दोरपेटी या दोन जहाल नक्षलवाद्याना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले। या घटनेवरुन सुरजागड येथे ,होत असलेल्या आंदोलनात गालबोट लागले आहे, अटक करण्यात आलेले जहाल नक्षली मुडी मासा (वय 32)हा नक्षलद्दष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या एटापल्ली तालुक्यातिल गोरगूटा येथिल रहिवासी असुन त्यावर दि. 27 फ्रेब्रुवारी 2019 ला झारेवाडा , दि.15 मारच 2020 ला बोडमेटा व दि.04मारच2021 ला कोपशी (भुरुमुशी)जंगल परिसरात झालेल्या चकमकित 03 गुन्हे दाखल आहेत, तो गट्टा दलम मधे भरती हवुन ,सशस्ञ दलम पदावर कायरत होता,तसेच नक्षल अक्शन टिमचे सदस्य होता शासनाकडून त्याच्यावर 02 लाख रुपयाचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते . जनमिलिया सदस्य मैनु दोरपेटी रा.बोडमेटा ता.एटापल्ली येथिल रहिवासी असुन याच्या दि.19सप्टेंबर 2021 रोजी सोमजी चैतु सडमाके रा.एटापल्ली या सामान्य नागरिकांची हेडरी व सुरजागड रोडवर केलेल्या खुनाच्या गुन्हामधे तसेच लाख रुपयाचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते, तो नक्षल्यांच्या हिंसक क्रतामध्ये नेहमी सामिल होवुन हातपातीचे घटना घडवुन आनण्याचे नक्षल्यांना मदत करत होता. जहाल नक्षली मुडा मासा झोही व मैनु दोरपेटी या दोन्ही नक्षल्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसाराचा आळा घालण्या करिता महाराष्ट्र शासनाने त्यावर एकुन 04 रुपयाचे बक्षिस जाहिर केले होते. या वेतिरिक्त त्यावर एकुन किती गुन्हामध्ये सहभागी आहेत याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहेत. सदर कांमगीरि पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मारगदशना खाली अपर पोलिस अधिक्षक (अभियान)सोमय्या मुडे, अप्पर पोलिस अधिक्षक( प्रशासन)समिर शेख, अप्पर पोलिस अधिक्षक अहेरी अनुज तारे यांच्या नैत्रूतवात विशेष अभियान पथकाची जवानांनी पार पाळली असुन, पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी सदर दोन्ही नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी स्वताच्या जिवाची परवा न करता परिश्रम घेतलेल्या जवानाचे कौतुक केले असुन .नक्षलवादाचा हिंसक कारवायावर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधि अभियान तिव्र केले आहे , नक्षल वाद्यानी हिंसक वाट सोडून आत्मसमरपन करुन सन्मानाने जिवन जगण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here