Home युवा मराठा विशेष गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील प्राथमिक शाळा सुरु

गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील प्राथमिक शाळा सुरु

259
0

राजेंद्र पाटील राऊत

गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील प्राथमिक शाळा सुरु
गुलबर्गा ,(जिल्हा प्रतिनिधी-श्री यशवंतराव अंबादासराव सुर्यवंशी युवा मराठा न्युज नेटवर्क)
कर्नाटक सरकाराच्या आदेशानुसार आळंद तालुक्यातील प्राथमिक शाळा सुरू
झाल्या असून प्रारंभ दिवशी बहुतेक शाळांमधून विद्यार्थ्यांचे पुष्पहार देऊन, आरती
ओवाळून व पुष्पवृष्टी करून त्याच बरोबर शाळा सजवून त्या-त्या ठिकाणच्या
शिक्षकांनी उत्साहाने व आनंदाने स्वागत केल्याचे शिक्षण खात्याकडून सांगण्यात
आले. सदरील शाळेतील विद्यार्थी खूपच उत्साहात दिसून येत होते. काही शाळेत
केळीची झाडे, रांगोळी यामुळे ऐन दिपावळीच्या मंगलमय वातावरण शाळेची सुरूवात
होवून संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोरोना या जागतिक महामारीमुळे सुमारे २ वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे
पालकामध्ये व विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे
शाळा बंद असल्यामुळे बस सेवा ही बंद आह तालुक्याच्या सीमावर्ती भागातील
विद्यार्थ्याची, पालकांची व प्रवासांची इतके दिवस बसेस बंद असल्यामुळे गैरसोय
होत आहे. वर्तमानकाळात कर्नाटक व महाराष्ट्र सरकार संयुक्तरित्या बस सेवा सुरू
करून विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक व
महाराष्ट्रातील प्रवासी नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here