Home विदर्भ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 35 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 35 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील प्रकल्पाचे लोकार्पण

65
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 35 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन
अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील प्रकल्पाचे लोकार्पण

(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क अकोला विदर्भ)
अमरावती: कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

पीएम केअर फंडातर्फे उभारण्यात आलेल्या देशभरातील 35 ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. त्याचा मुख्य सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे झाला. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्पाचाही त्यात समावेश असून,

यानिमित्ताने स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा,आमदार प्रताप अडसड, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोना संकटकाळातील अडचणींवर अथक प्रयत्नांतून केलेली मात, विविध सुविधांची वेगाने निर्मिती आदी बाबींवर प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. ते म्हणाले की, कोरोना संकटकाळात देशाने अत्यंत थोड्या काळात गतीने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उभारल्या. रूग्णालये, प्रयोगशाळा, ऑक्सिजन निर्मिती, लसीकरण मोहिम अशा कितीतरी गोष्टींना चालना देण्यात आली. अत्यंत थोड्या काळात देशाने उभारलेले हे कार्य समस्त भारतीयांच्या बंधुभाव व एकतेचे प्रतिक आहे. वैद्यकीय प्राणवायूची गरज लक्षात घेऊन उत्पादनात दसपट वाढ कऱण्यात आली. भौगोलिक वैविध्य पाहता देशाच्या कानाकोप-यात ऑक्सिजनची वेगवान वाहतूक हे आव्हान होते. मात्र, भारताने ते यशस्वीरित्या करून दाखवले. वायूसेना व डीआरडीओने त्यासाठी योगदान दिले. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे मोठे नेटवर्क देशभर उभे राहिले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध

अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनची मागणी 23 मे. टन पर्यंत पोहोचली होती. हे लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचे उत्पादन तिप्पट वाढविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आजमितीला प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. पीएम केअर फंडातून ‘एल अँड टी’ आणि ‘डीआरडीओ’ यांच्या सहयोगातून हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यात 17 पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे नियोजन असून, त्यातील 3 प्रकल्प पीएम केअर फंडातून उभारण्यात येत आहे. त्यात अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील प्रकल्प 1 हजार एलपीएम क्षमतेचा आहे. दुसरा प्रकल्प मोझरी येथील आयुर्वेद रुग्णालय येथे असून, त्याची क्षमता 1 हजार एलपीएम आहे. तिसरा प्लांट दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात असून त्याची क्षमता 200 एलपीएम आहे. कार्यक्रमानंतर खासदार श्री. तडस, खासदार श्रीमती राणा, आमदार श्री. तडस, जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी प्रकल्पाची पाहणी केली व वैद्यकीय अधिकारी, तसेच तंत्रज्ञांशी चर्चा केली.

Previous articleयुवा मराठा न्युज चॅनलचे शासन दरबारी साकडे! कधी थांबणार विजेचा लपंडाव…… विशेष लेख बस्स आता वीज दरवाढ नकोच…?
Next articleपाहुणे येती घरा….!, प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांना अजिदादांनी का दिली पाहुण्यांची उपमा?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here