राजेंद्र पाटील राऊत
🛑 परमबीर सिंह फरार..? सीआयडीकडून शोध सुरू 🛑
✍️ मुंबई : ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई:⭕ सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती.
या प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी समोर आल्या होत्या. दरम्यान राज्य सरकारने सुरु केलेल्या चौकशीविरोधात परमबीर सिंग यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच त्यांना केंद्रीय लवादाकडे जाण्याचा पर्याय असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे सीआयडीने परमबीर सिंग यांचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे सिंग फरार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चांदीवाल आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे सीआयडीने सिंग यांचा शोध सुरु केला आहे. परमबीर सिंग चंदीगडच्या घरीही सापडलेले नाहीत. त्यामुळे आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर यावरूनच अनिल देशमुखप्रमाणे परमबीर सिंगही फरार झाल्याची टीका भाजपकडून राज्य सरकारवर केली जात आहे.⭕