Home माझं गाव माझं गा-हाणं आश्रयआशा फाऊंडेशन प्रणित राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाकडून विविध गणेश मंडळाना सन्मानपत्र

आश्रयआशा फाऊंडेशन प्रणित राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाकडून विविध गणेश मंडळाना सन्मानपत्र

143
0

राजेंद्र पाटील राऊत

आश्रयआशा फाऊंडेशन प्रणित राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाकडून विविध गणेश मंडळाना सन्मानपत्र
मालेगांव/आंशूराज पाटील राऊत- मालेगांव शहरातल्या कँम्प भागातील विविध ठिकाणच्या दहा गणेश मंडळाना आश्रयआशा फाऊंडेशन प्रणित राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने सन्मानपत्र बहाल करुन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी आश्रयआशा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांच्या हस्ते हे सन्मानपत्र वितरीत करण्यात आलेत.
मालेगांव शहरातल्या कँम्प भागातील गणेश मंडळाना शांततेत व आनंदी वातावरणात शासनाच्या नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा केला म्हणून आश्रयआशा फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी मोची काँर्नर,रचनानगर,छत्रपती शिवाजीमहाराज वाडी,गणेशनगर,क्रांतीनगर महाराष्ट्र काँलनी आदी ठिकाणच्या गणेश मंडळाना सन्मानीत करण्यात आले.याप्रसंगी युवा मराठाचे वृतसंपादक आंशूराज पाटील राऊत,सक्षम पोलिस टाईम्सचे उपसंपादक प्रवीण पवार ,नगरसेवक दिनेश साबणे,आनिल जाधव मोहन कांबळे, लोकेश चव्हाण, मयुर वांद्रे श्याम गांगुर्डसह गणेशभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी “युवा मराठा”चे मुख्य संपादक व आश्रयआशा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांचा छत्रपती शिवाजी महाराज वाडी येथील शिव गणेश मंडळाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.

Previous articleपरमबीर सिंह फरार..? सीआयडीकडून शोध सुरू 🛑
Next articleमोताळा ब्रेकिंग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here